esakal | कोरोनानंतरच्या पहिल्याच दौऱ्यासाठी भारतीय बॅडमिंटन संघ थायलंडला रवाना 
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal  (4).jpg

थायलंड मध्ये होणाऱ्या तीन स्पर्धेसाठी भारतीय बॅडमिंटन संघ आज रवाना झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात थायलंड मध्ये तीन बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, यातील पहिला स्पर्धा योनेक्स ओपन, दुसरी टोयोटा ओपन आणि त्यानंतर वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनची वर्ल्ड टूर फायनल्स खेळवण्यात येणार आहे.

कोरोनानंतरच्या पहिल्याच दौऱ्यासाठी भारतीय बॅडमिंटन संघ थायलंडला रवाना 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

थायलंड मध्ये होणाऱ्या तीन स्पर्धेसाठी भारतीय बॅडमिंटन संघ आज रवाना झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात थायलंड मध्ये तीन बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, यातील पहिला स्पर्धा योनेक्स ओपन, दुसरी टोयोटा ओपन आणि त्यानंतर वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनची वर्ल्ड टूर फायनल्स खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघात सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत आणि बी साई प्रणीत यांचा समावेश आहे. तर विश्वविजेते पी.व्ही. सिंधू ऑक्टोबरपासून प्रशिक्षण घेत असलेल्या इंग्लंडहून थायलंडला जाणार आहे. 

योनेक्स थायलंड ओपन स्पर्धा 12 ते 17 जानेवारी, टोयोटा थायलंड ओपन स्पर्धा 19 ते 24 जानेवारी आणि वर्ल्ड टूर फायनल्स  27 ते 31 जानेवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. बॅडमिंटपटू किदांबी श्रीकांत व्यतिरिक्त इतर सर्व खेळाडू कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच कोर्टवर उतरणार आहेत. तर ऑक्टोबर मध्ये पार पडलेल्या डेन्मार्क ओपन स्पर्धेत किदांबी श्रीकांतने सहभाग घेतला होता. व या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत त्याने मजल मारली होती. 

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

किदांबी श्रीकांत, बी साई प्रणीत आणि युवा लक्ष्य सेन यांच्यासह पुरुष एकेरीत एकूण सात खेळाडू सहभागी होणार आहेत. योनेक्स ओपन स्पर्धेत किदांबी श्रीकांतची लढत सौरभ वर्मासोबत होणार आहे. त्यानंतर युवा लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या रॅस्मस गेमकेशी होणार आहे. आणि बी साई प्रणीतचा सामना कांताफोन वांगचरोन सोबत होईल. तर टोयोटा ओपन स्पर्धेत श्रीकांतचा सामना सिटीकोम थामासीं, बी साई प्रणीतची लढत मलेशियाच्या डेरेन लियू आणि युवा लक्ष्य सेनचा सामना चीन तैपेईच्या चो तियेन चेनशी होणार आहे. 

याव्यतिरिक्त, योनेक्स थायलंड बॅडमिंटन ओपन स्पर्धेत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधूचा सामना डेन्मार्कच्या मिया ब्लिचफिल्ड सोबत होणार आहे. तर सायना नेहवालची लढत जपानच्या नाजोमी ओकुहरा सोबत होणार आहे. आणि यानंतर टोयोटा थायलंड स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पीव्ही सिंधूचा पहिला सामना थायलंडच्याच बुसानन ओंगबरंगफनशी होणार आहे. व सायना नेहवालचा सामना थायलंडचीच स्टार बॅडमिंटनपटू चौथी मानांकित रतचणोक इंतानोन सोबत खेळवण्यात येणार आहे. 
 

loading image