

Lovlina Borgohain and Narender Berwal
esakal
निशिओ (जपान) : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सना कठीण ड्रॉ मिळाला आहे. लवलिना बोर्गोहेन आणि नरेंद्र बेरवाल हे आपली मोहीम थेट उपांत्यपूर्व फेरीपासून सुरू करतील. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय बॉक्सर्सच्या शानदार कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक पटकावण्याच्या आशा वाढल्या आहेत; मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेतील आव्हान अधिक कठीण आहे. या स्पर्धेत पुरुषांच्या सहा आणि महिलांच्या पाच वजन गटांचा समावेश आहे. मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एक रौप्य आणि तीन ब्राँझ अशी चार पदके जिंकली होती.