esakal | टी-20 वर्ल्ड कप टीम सिलेक्शनवेळी रंगली धोनीची चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni

2007 मध्ये मर्यादित षटकांच्या वर्ल्ड कप स्पर्धेत द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पहिल्यांदा होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच्या नेतृत्वाची धूरा महेंद्र सिंह धोनीच्या खांद्यावर येऊन पडली. झटपट क्रिकेटच्या दुनियेत भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल, असे स्वप्न त्यावेळी कोणीही पाहिले नसेल. पण धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत पहिला वहिला वर्ल्ड कप उंचावला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपशिवाय आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि मर्यादित षटकांच्या वर्ल्ड कपवरही नाव कोरले आहे.

टी-20 वर्ल्ड कप टीम सिलेक्शनवेळी रंगली धोनीची चर्चा

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारताच्या यजमानपदाखाली युएईच्या मैदानात रंगणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कोणाला संघात घेणार कोण बाहेर राहणार? या चर्चेत आणखी एक विषय सध्या चर्चेचा झालाय. सोशल मीडियावर #T20WorldCup या हॅश टॅगशिवाय #MSDhoni हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये दिसतोय. 2007 मध्ये पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात आली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावले होते.

2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या मर्यादित षटकांच्या वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा अखेरचा सामना ठरला. पदार्पणातील सामन्यात धावबाद झालेला धोनी न्यूझीलंड विरुद्ध धावबाद झाला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसीच्या सर्व ट्रॉफ्या जिंकल्या आहेत. क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.

हेही वाचा: T20 World Cup: 'टीम इंडिया'च्या घोषणेआधी 'या' खेळाडूची चर्चा

2007 पासून सुरु झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय टीम धोनीशिवाय मैदानात उतरणार आहे. त्यामुळेच अनेकांना धोनीची आठवण सतावताना दिसते. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. टी-20 वर्ल्ड कपवेळी धोनीची आठवण येईल. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियातील खेळाडूंना अधिक तणाव नसायचा, अशा भावना धोनीच्या चाहत्यांकडून उमटताना पाहायला मिळत आहे.

loading image
go to top