esakal | T20 World Cup: 'टीम इंडिया'च्या घोषणेआधी 'या' खेळाडूची चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

T20 World Cup: 'टीम इंडिया'च्या घोषणेआधी 'या' खेळाडूची चर्चा

sakal_logo
By
विराज भागवत

विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय टी२० संघ आज होणार जाहीर

T20 World Cup 2021: ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी जवळपास सर्वच संघांनी आपले १५ खेळाडूंचे चमू (Squad) जाहीर केले आहे. भारताचा (Team India) संघ ८ सप्टेंबर म्हणजेच आज जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून आपल्या पसंतीचा संघ (Teams) कोणता असावा, त्यात कोणते खेळाडू असावेत, कोणाला वगळावं अशी चर्चा रंगली आहे. तशातच मुंबई इंडियन्सकडून गेली २-३ वर्षे खेळलेला राहुल चहर (Rahul Chahar) याची ट्विटरवर तुफान चर्चा रंगल्याने दिसून आले.

हेही वाचा: गावसकरांनी निवडला T20 WC चा संघ; धवन, श्रेयसला डावलले

भारतीय संघात कोणाकोणाला स्थान मिळणार याची सध्या जोरदार चर्चा आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर या खेळाडूंची नावे जवळपास निश्चित आहे. वेगवान गोलंदाज म्हणून शार्दूल ठाकूर, टी नटराजन, मोहम्मद सिराज यांच्या नावांबाबत चाहत्यांमध्ये मतभेद आहेत. पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, संघात लेग स्पिनर म्हणून कोण असावा यावर युजवेंद्र चहलपेक्षाही राहुल चहरच्या नावाची जास्त चर्चा असल्याची स्थिती आहे.

पाहा त्या संदर्भातील काही ट्वीट्स-

हेही वाचा: T20 World Cup: सबा करीम म्हणतात, 'या' दोघांची संघाला गरज नाही!

दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू सबा करीम यांनीही युजवेंद्र चहलपेक्षा राहुल चहरलाच पसंती दिली आहे. "गोलंदाजीत फिरकीपटू म्हणून मला वाटतं की राहुल चहर हा युझवेंद्र चहलपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल. तो उत्तम गोलंदाज तर आहेच. त्यासोबत चांगला फिल्डरही आहे. आणि जर वॉशिंग्टन सुंदर फिट नसेल तर वरूण चक्रवर्तीच्या नावाचा विचार नक्कीच व्हायला हवा", असेही सबा करीम यांनी मत व्यक्त केले आहे.

loading image
go to top