esakal | टीम इंडिया पुढच्या वर्षी जुलैमध्ये पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Ind-vs-Eng-2022

टीम इंडिया पुढच्या वर्षी जुलैमध्ये पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर

sakal_logo
By
विराज भागवत

इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने जाहीर केला वर्षभराचा कार्यक्रम

India tour of England: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. ५ सामन्यांपैकी ४ सामने खेळून पूर्ण झाले आहेत. त्यातील २ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. इंग्लंडच्या वाट्याला १ विजय आला असून एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे आता शेवटच्या कसोटी सामन्यावर भारत मालिका जिंकणार की मालिका बरोबरीत सुटणार याचा निर्णय होणार आहे. या मालिकेनंतर भारताचा संघ युएईमध्ये दाखल होणार आहे. तेथे आधी IPL 2021 चा उर्वरित हंगाम खेळला जाणार आहे आणि त्यानंतर T20 World Cup 2021चा थरार रंगणार आहे. भारताचा पुढील वर्षाचा कार्यक्रम अद्याप ठरलेला नसला तरी टीम इंडिया जुलै २०२२मध्ये इंग्लंडला असणार आहे, अशी अधिकृत माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा: IND vs ENG: विराटचं करायचं तरी काय? रूटने कॅच सोडला तरीही...

भारतीय संघ जुलै २०२२ ला इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. भारताचा हा दौरा कसोटी सामन्यांचा नसून केवळ निर्धारित षटकांच्या मालिकांचा असेल. या दौऱ्याची सुरूवात टी२० मालिकेने होणार आहे. १ जुलैला ओल्ड ट्रॅफर्ड येथे पहिला सामना होईल. त्यानंतर ३ जुलैला ट्रेंट ब्रिजला दुसरा तर ६ जुलैला एजेस बाऊलला तिसरा टी२० सामना रंगणार आहे. टी२० मालिकेनंतर लगेचच वन डे मालिकादेखील असणार आहे. ९ जुलैला एडबस्टनला पहिला तर १२ जुलैला ओव्हलवर दुसरा वन डे सामना खेळला जाईल. १४ जुलैला लॉर्ड्सच्या मैदानावर या दौऱ्याचा शेवट होईल.

हेही वाचा: रोहितने मोडला द्रविडचा विक्रम; ब्रॅडमन यांच्या पंगतीत स्थान

भारत - इंग्लंड टी२० मालिका

1 जुलै 2022 - एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड

3 जुलै 2022 - ट्रेंट ब्रिज

6 जुलै 2022 - एजेस बाऊल

भारत - इंग्लंड टी२० मालिका

9 जुलै 2022 - एजबॅस्टन

12 जुलै 2022 - ओव्हल

14 जुलै 2022 - लॉर्ड्स.

loading image
go to top