esakal | इंग्लंडमधील भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्लंडमधील भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण

इंग्लंडमधील भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण

sakal_logo
By
नामदेव कुंभार

विश्व कसोटी अजिक्यंपद स्पर्धेनंतर ब्रेकवर असणाऱ्या भारतीय संघातील एका खेळाडूला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या खेळाडूचं नाव गुलदस्त्यातच असून त्याला आणि कुटुंबाला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात न्यूझीलंडबरोबर विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये सुट्टीवर आहे. इंग्लंडमध्ये विविध ठिकाणी फिरण्यसाठी गेल्यानंतर त्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं समजतं.

4 ऑगस्टपासून इंग्लंडविरोधात भारताची कसोटी मालिका सुरु होणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं. या खेळाडूला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे. इंग्लंडविरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेला अद्याप 20 दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीत त्या खेळाडूचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण होईल. मात्र, विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतरही पुन्हा कोरोना कसा झाला हा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे.

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकापूर्वी भारतीय संघ सुट्टीवर आहे. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा यासह संघातील इतर खेळाडू सुट्टीचा आनंद घेत असल्याची अनेक छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. सुट्टीचा आनंद घेताना खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा: राज्यात लवकरच महाभरती; MPSC अंतर्गत 15 हजार जागा भरणार

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्याच्या घडीला इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 4 ऑगस्ट पासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होईल. न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. हा पराभव विसरुन इंग्लंड विरुद्धच्या मालिकेने भारतीय संघ दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीला लागणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी हा आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. त्यामुळे मालिकेत दमदार कामगिरी करुन आपली दावेदारी भक्कम करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.

हेही वाचा: फडणवीस यांना नेता मानत नाहीत का? पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर

loading image