
16 वर्षीय भारतीयाचा धमाका; वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनचा दुसऱ्यांदा केला पराभव
भारतीय ग्रँड मास्टर आर. प्रग्नानंधा या अवघ्या सोळा वर्षिय खेळाडूने चेसबल्स मास्टर्स ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत जागतिक चॅम्पियन मॅग्नस कार्लसनचा दुसऱ्यांदा पराभव केला. आर. प्रग्नानंधाने दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत कार्लसनचा दुसऱ्यांदा पराभव केलाय. वल्ड चॅम्पियन कार्लसनकडून त्याच्या 40व्या चालीमध्ये मोठी चूक झाली आणि प्रग्नानंधाने यांचा फायदा घेतला आणि कार्लसनला पराभूत करण्यात यश मिळवलं. (Indian Grandmaster Rameshbabu praggnanandhaa stuns magnus carlsen again)
यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रग्नानंधाने एअरथिंग्स मास्टर्स ऑनलाइन रैपिड बुध्दिबळ स्पर्धेत टूर्नामेंट मध्ये कार्लसनला पराभूत करण्याची अप्रतिम कामगिरी केली होती. चेसबल मास्टर्स स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास, चेसबल मास्टर्सच्या दुसऱ्या दिवसानंतर कार्लसन 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर प्रज्ञानंधाने 12 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. चीनचा वेई 18 गुणांसह अव्वल तर डेव्हिड अँटोन 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
Web Title: Indian Grandmaster Rameshbabu Praggnanandhaa Stuns Magnus Carlsen Again
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..