Asian Games 2023 : अनुराग ठाकूर यांनी दिली आनंदाची बातमी... अखेर भारतीय फुटबॉल संघ चीनमध्ये जाणार

Asian Games 2023 Indian men's football team
Asian Games 2023 Indian men's football teamesakal

Asian Games 2023 Indian men's football team : भारतीय पुरूष फुटबॉल संघाचा एशियन गेम्स 2023 मध्ये सहभाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी क्रीडा मंत्रालयाकडून विशेष सूट मिळाली आहे. भारतीय संघाला 2018 मध्ये झालेल्या जकार्ता गेम्समध्ये सहभाग घेता आला नव्हता. सध्या भारतीय संघ आशियामध्ये 18 व्या रँकिंगवर आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या नियमानुसार जे संघ आशियामध्ये पहिल्या आठ रँकिंगमध्ये येतात त्यांनाच एशियन गेम्ससाठी पाठवलं जातं. मात्र यंदा भारतीय फुटबॉल संघाला यातून सूट मिळाल्याची घोषणा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. त्यांनी पुरूष आणि महिला फुटबॉल संघ एशियन गेम्समध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले.

Asian Games 2023 Indian men's football team
Sri Lanka vs Pakistan : चर्चा बॅझबॉलची नाही तर पाकबॉलची! लंकेत मोठा धमाका, मालिकेवर पकड केली मजबूत

अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी ट्विट केले की, 'भारतीय फुटबॉल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी! आपला पुरूष आणि महिला राष्ट्रीय फुटबॉल संघ आगामी एशियन गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाने दोन्ही संघांना एशियन गेम्समध्ये सहभागी होता यावे यासाठी आपले नियम शिथील केले आहेत.'

'सध्याच्या नियमांनुसार ते एशियन गेम्ससाठी पात्र होणार नव्हते. मात्र त्यांनी नुकत्याच झालेल्या स्पर्धांमध्ये केलेल्या दमदार कामगिरीचा विचार करत मंत्रालयाने या नियमात शिथीलता आणून त्यांचा एशियन गेम्समध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. मला खात्री आहे ते एशियन गेम्समध्ये दमदार कामगिरी करत आपल्या देशाचा गौरव वाढवतील.' (Sports Ministry)

Asian Games 2023 Indian men's football team
Yashasvi Jaiswal : पदार्पणातच यशस्वी जैसवालची रँकिंगमध्ये 11 स्थानांची उडी, रोहितही फायद्यात

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन एशियन गेम्ससाठी सुनिल छेत्रीच्या नेतृत्वातील आपला सर्वोत्तम संघ पाठवण्यासाठी आशावादी आहे. क्रोएशियाचे एगोर स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने नकतेच फिफा रँकिंगच्या सब 100 क्लबमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी साऊथ एशिया फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप (SAFF) जिंकली आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com