esakal | Tokyo Olympics: भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक
sakal

बोलून बातमी शोधा

Tokyo Olympics: भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

Tokyo Olympics: भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

sakal_logo
By
विराज भागवत

ग्रेट ब्रिटनचा ३-१ ने धुव्वा उडवत मिळवला विजय

Tokyo Olympics टोक्यो: ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरीचा इतिहास असलेल्या भारतीय पुरूष हॉकी संघाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करणं सुरू ठेवलं. भारताने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनच्या संघाला ३-१ असे पराभूत केले आणि ऑलिम्पिक स्पर्धेचे सेमीफायनलचे तिकीट मिळवले. भारताने सामन्यार पूर्णपणे वर्चस्व राखलं आणि संघाची विजयी आगेकूच सुरू ठेवली. आता भारताचा पुढील सामना बेल्जियमशी होणार आहे.

हेही वाचा: सिंधूची मेडल जिंकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाली...

४१ वर्षांनी मारली सेमीफायनलमध्ये धडक

भारतीय संघाने दमदार खेळ केला. दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि हार्दिक सिंग या तिघांनी भारताकडून प्रत्येकी एक-एक गोला केला. सामना सुरू झाला तेव्हापासूनच भारतीय संघाने आक्रमणाला सुरूवात केली. सामन्याचा निकाल काय लागेल याची कल्पना खूपच लवकर चाहत्यांना आली होती. कारण भारतीय संघाने आक्रमक खेळ करत पूर्वार्धात २-० ने आघाडी घेतली होती. उत्तरार्धात संघातील काही खेळाडूंच्या चुकांमुळे ग्रेट ब्रिटनला एक गोल करण्याची संधी मिळाली. भारताने पुन्हा गोल करत सामना ३-१ असा जिंकला. महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय संघाला तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये धडक मारणं शक्य झालं.

loading image
go to top