esakal | IPL 2021 : ऑरेंज आर्मीवर पुन्हा एकदा नाईट रायडर्स पडले भारी

बोलून बातमी शोधा

kkr vs srh

कोलकाता नाईट रायडर्सने 13 व्या वेळी सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले आहे.

IPL 2021 : ऑरेंज आर्मीवर पुन्हा एकदा नाईट रायडर्स पडले भारी
sakal_logo
By
टीम सकाळ

IPL 2021, SRHvsKKR 3rd Match: चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने डेविड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाला रोखत स्पर्धेत विजयी सलामी दिली. कोलकाता नाईट रायडर्सने 10 धावांनी विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर नितीश राणा 80 (56) आणि राहुल त्रिपाठी 53 (29) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताच्या संघाने निर्धारित 20 षटकात 6 बाद 187 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ निर्धारित 20 षटकात 5 बाद 177 धावांपर्यंत मजल मारु शकला. कोलकाता नाईट रायडर्सने 13 व्या वेळी सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले आहे.  

188 धावांचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार डेविड वॉर्नर आणि वृद्धीमान साहा ही जोडी मैदानात उतरली. धावफलकावर अवघ्या 10 धावा असताना प्रसिद्ध कृष्णाच्या गळाला मोठा मासा लागला.  त्याने डेविड वॉर्नरला 3 धावांवर तंबूत धाडले. त्याच्यापाठोपाठ साहाही माघारी फिरला. 2 बाद 10 अशी बिकट अवस्था असताना मनिष पांडे आणि जॉनी बेयरस्टो यांनी संघाच्या डावाला आकार दिला. दोघांनी शतकी भागीदारी केली. 40 चेंडूत 55 धावा करुन बेयस्टोने मैदान सोडले. यात त्याने 5 चौकार आणि 3 षटकार खेचले. मनिष पांड्ये 44 चेंडूत 61 धावा करुन शेवटपर्यंत नाबाद राहिला.

IPL 2021 : पांड्येजीनं घेतला जबऱ्या कॅच; VIP गॅलरीतून मिळाली दाद (VIDEO)

आपल्या या खेळीत त्याने 2 चौकार आणि 3 षटकार खेचले. मोहम्मद नबी 14 (11), विजय शंकर 11 (7) धावा करुन परतल्यानंतर अब्दुल समदने 8 चेंडूत 19 धावा केल्या. पण पांड्ये-समद जोडी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. सनरायझर्स हैदराबादचा संघ निर्धारित 20 षटकात 5 बाद 177 धावांपर्यंतच मजल मारु शकला. कोलकाता नाईट रायडर्सकडून प्रसिद्ध कृष्णाने 2, पॅट कमिन्स, आंद्रे रसेल आणि शाकिब अल हसन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 

IPL 2021 : कोरोनातून सावरलेल्या KKR च्या राणादाची स्फोटक खेळी

 कोलकाता नाईट रायडर्सला सलामीवीर शुभमन गिल आणि नितीश राणा यांनी चांगली सुरुवात करुन दिली. संघाच्या धावफलकावर 53 धावा असताना गिल 15 धावांवर माघारी फिरला. त्यानंतर राहुल त्रिपाठीने राणाच्या साथीने 93 धावांची भागीदारी केली. तो 29 चेंडूत 53 धावा केल्या. नितिश राणा शतकी खेळी करेल असे वाटत असताना नबीने त्याला 80 धावांवर बाद केले. अखेरच्या षटकात दिनेश कार्तिकने 9 चेंडूत 22 धावा करत संघाची धावसंख्या 6 बाद 187 पर्यंत पोहचवली होती.