भारताच्या रिले संघाचे राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण; मात्र ऑलिंपिक पात्रतेपासून दूरच

भारताच्या मिश्र संघाने ३ मिनिटे व १४.१२ सेकंदात शर्यत पूर्ण केली व नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला.
indian relay team gold with national record far from Olympic qualification bangkok
indian relay team gold with national record far from Olympic qualification bangkok Sakal
Updated on

बँकॉक : भारताच्या मिश्र ४-४०० रिले संघाने आशियाई रिले अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सोमवारी राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. मात्र उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतरही भारतीय संघाला पॅरिस ऑलिंपिकच्या पात्रतेपासून दूरच रहावे लागले. भारताच्या मिश्र संघात मुहम्मद अजमल, ज्योतीका श्रीदंडी, अमोज जेकब व शुभा व्यंकटेशन या खेळाडूंचा समावेश होता.

भारताच्या मिश्र संघाने ३ मिनिटे व १४.१२ सेकंदात शर्यत पूर्ण केली व नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. या विक्रमासह भारताच्या मिश्र संघाला सुवर्णपदकावरही हक्क सांगता आला. मात्र पॅरिस ऑलिंपिकची पात्रता त्यांना मिळवता आली नाही. याआधी भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता.

हांगझाऊ येथे झालेल्या स्पर्धेमध्ये भारतीय मिश्र संघाने ३ मिनिटे व १४.३४ सेकंदांत शर्यत पूर्ण करीत हा विक्रम नोंदवला होता. श्रीलंकन मिश्र संघाने ३ मिनिटे व १७ सेकंद अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली व रौप्यपदकाची कमाई केली. व्हिएतनाम मिश्र संघाने ३ मिनिटे व १८.४५ सेकंदांत शर्यत पूर्ण करीत ब्राँझपदकावर नाव कोरले.

१६ संघांनाच पॅरिसमध्ये संधी

मिश्र ४-४०० रिले प्रकारासाठी जगातील १६ संघांनाच पॅरिस ऑलिंपिकमध्ये संधी देण्यात येणार आहे. त्यापैकी १४ संघ बहामास येथील जागतिक ॲथलेटिक्स रिले स्पर्धेमधून निश्‍चित झाले आहेत. आणखी दोन संघांना पॅरिसचे तिकीट बुक करता येणार आहे. सध्या झेक प्रजासत्ताक (३.११.९८) व इटली (३.१३.५६) हे दोन देश १५ व्या व १६ व्या स्थानावर आहेत.

भारतीय संघ २१ व्या स्थानावर

भारतीय मिश्र संघाने आशियाई रिले स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले, पण त्यांना अव्वल १६ संघांमध्ये प्रवेश करता आला नाही. सध्या भारतीय संघ २१ व्या स्थानावर आहे. याआधी तो २३ व्या स्थानावर होता. जागतिक ॲथलेटिक्स रिले शर्यतीत भारताच्या मिश्र रिले संघाला पात्रता मिळवता आली नाही.

भारताच्या मिश्र रिले संघातील राजेश रमेशला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघाला माघार घ्यावी लागली होती. आता भारतीय ॲथलेटिक्स संघटनेकडून भारताच्या मिश्र रिले संघासाठी पाऊल उचलण्यात येऊ शकते. पॅरिस ऑलिंपिकमध्ये पात्र ठरण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. तोपर्यंत आयोजित करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन पात्रता मिळवण्यासाठी भारताचा मिश्र रिले संघ प्रयत्न करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com