भारतीय नेमबाज धनुष श्रीकांतनं जिंकलं सुवर्णपदक; जर्मनीत भारताचा डंका : ISSF Junior World Cup | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanush Shrikant

ISSF Junior World Cup: भारतीय नेमबाज धनुष श्रीकांतनं जिंकलं सुवर्णपदक; जर्मनीत भारताचा डंका

नवी दिल्ली : भारतीय नेमबाज धनुष श्रीकांत यानं जर्मनीत सुरु असलेल्या ISSF ज्युनिअर वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. त्यानं पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताचं नाव उंचावलं आहे. (Indian shooter Dhanush Srikanth wins gold in men 10m air rifle event in ISSF Junior World Cup in Germany)

या स्पर्धेत भारत पदक तालिकेत आघाडीवर असून भारताच्या सुवर्णपदकांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर एक सिल्व्हर आणि दोन ब्रॉन्झ पदकं भारताच्या नावावर आहेत, अशी एकूण सहा पदकं भारतानं कमावली आहेत. (Latest Sport News)

कोण आहे धनुष श्रीकांत?

धनुष श्रीकांत हे तेलंगाणाचा रहिवासी असून तो मुकबधिर आहे. जर्मनीच्या सुहल इथं सुरु असलेल्या ISSF ज्युनिअर वर्ल्डकप मध्ये त्यानं स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी सुवर्णपदकाची कमाई केली. १० मीटर एअर रायफलमध्ये त्यानं ही कमाई केली आहे. तेलंगाणामधील तो पहिलाच दोनदा सुवर्णपदकं जिकणारा खेळाडू ठरला आहे.

टॅग्स :Indiasports