Asian Shooting Championship: भारतीय नेमबाजांची पदकांची लयलूट; आशियाई नेमबाजी, वरिष्ठ विभागात अनंत जीतला सुवर्णपदक
Indian Shooters: भारतीय नेमबाजांनी आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत शानदार कामगिरी करत १९ पदकांची कमाई केली. अनंत जीत सिंह नारुका याने वरिष्ठ विभागात सुवर्णपदक पटकावत भारताचा गौरव वाढवला.
नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील पदकांची लयलूट बुधवारीही कायम राहिली. ऑलिंपियन खेळाडू अनंत जीत सिंह नारुका याने पुरुषांच्या स्कीट प्रकारात सुवर्णपदक पटकावत दिवस गाजवला.