INDvsAUS : 'कॅप्टन क्वीन'ची कमाल; 'या' विक्रमाशी साधली बरोबरी!

Harmanpreet-Smriti
Harmanpreet-Smriti

INDvsAUS : मेलबर्न : सध्या ऑस्ट्रेलियात महिलांची तिरंगी टी-20 स्पर्धा सुरू आहे. आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याच झालेल्या मॅचमध्ये भारतीय महिलांनी बाजी मारली. महाराष्ट्राची कन्या स्मृती मंधानाने आपल्या शैलीला साजेशी खेळी करताना अर्धशतक साजरे केले. 

स्मृतीने एका बाजूने किल्ला लढता ठेवलेला असताना दुसऱ्या बाजूने भारताची सलामीवीर शेफाली वर्माने धुवांधार बॅटिंग करताना 28 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्स ठोकत 49 रन्सचा पाऊस पाडला. पण तिचे अर्धशतक फक्त एका रनने हुकले.

स्मृतीने 48 चेंडूत 7 फोरच्या जोरावर 55 रन्सची संयमी खेळी केली. त्यानंतर रॉड्रिग्जही झटपट 30 रन्स काढून माघारी परतली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या हरमनप्रीत (20*) आणि दीप्ती शर्मा (11*) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्बत केले. आणि 7 विकेट्सने ही मॅच जिंकली. 

'कॅप्टन क्वीन' हरमनने साधली बरोबरी

दरम्यान, आपल्या नाबाद 20 रन्सच्या खेळीमध्ये कॅप्टन क्वीन हरमनप्रीतने एका आगळ्यावेगळ्या विक्रमाशी बरोबरी साधली. आंतरराष्ट्रीय महिला टी-20 क्रिकेटमध्ये टार्गेटचा पाठलाग करताना सर्वात जास्त वेळा नाबाद राहण्याच्या विक्रमाशी हरमनने बरोबरी साधली. वेस्ट इंडिजची खेळाडू डेंड्रा डॉटीनच्या नावावर हा विक्रम होता. डेंड्राने 54 सामन्यांमध्ये टार्गेटचा पाठलाग करताना 13 वेळा नाबाद राहण्याचा पराक्रम केला आहे. तर हरमनने 40 मॅचमध्ये 13 वेळा नाबाद राहत डेंड्राच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 

टीम इंडियाच्या नावावर जमा झालाय हा अनोखा रेकॉर्ड

हरमनप्रीतच्या रेकॉर्डनंतर टीम इंडियाच्या नावावरही एक वेगळा रेकॉर्ड जमा झाला आहे. मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग करणारी तिसरी टीम हा नवा रेकॉर्ड टीम इंडियाच्या नावावर जमा झाला. या यादीत इंग्लंड महिला क्रिकेट संघ अव्वलस्थानी आहे. त्यांनी भारताविरुद्ध 199 रन्स (2018) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 179 रन्स (2017) च्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग केला होता. 

दोन बॉल राखून मिळविला विजय

टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 173 रन्सवर रोखले. ऑस्ट्रेलियाने दिलेले टार्गेट टीम इंडियाने 19.4 ओव्हरमध्ये 3 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com