FIFA : भारतावरील बंदी ‘फिफा’ने उठवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA Suspends AIFF

FIFA : भारतावरील बंदी ‘फिफा’ने उठवली

नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल संघटनेच्या (एआयएफएफ) कामकाजात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप होत असल्याचे कारण देत जागतिक फुटबॉल संघटनेकडून (फिफा) लादण्यात आलेली बंदी शुक्रवारी उठवण्यात आली. ‘फिफा’कडून घेण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता ११ ते ३० ऑक्टोबर या दरम्यान भारतामध्ये होणार असलेल्या महिलांच्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्‍वकरंडकाच्या आयोजनाचा मार्गही मोकळा झाला आहे. ही स्पर्धा आता नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे.

‘फिफा’कडून या वेळी स्पष्ट करण्यात आले की, ‘एआयएफएफ’च्या कार्यकारिणी समितीवर प्रशासकीय समिती नेमण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाकडून या समितीचे अधिकार रद्द करण्यात आले. त्यामुळे तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाचा मुद्दा निकाली निघाला. तसेच आता या संघटनेवर ‘एआयएफएफ’च्याच व्यवस्थापनाचाच ताबा राहणार आहे. या कारणांमुळे भारतावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. फिफा व आशियाई संघटना या दोन्हींची भारतातील घडामोडींवर नजर असणार आहे. तसेच २ सप्टेंबरला होणारी निवडणूक प्रकिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी ‘एआयएफएफ’ला सहकार्य करणार असल्याचेही ‘फिफा’कडून याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Indian Sports Lovers Fifa Lifts Ban On Aiff From Team India Women World Cup Held In India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sportsfifaFootball