भारतीय टेबल टेनिस महासंघाची मान्यता रद्द, क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलंय?

TTFI Recognition Cancelled : या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रालयाने महासंघाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, TTFIकडून देण्यात आलेलं उत्तर समाधानकारक नसल्याचं सांगत क्रीडा मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
TTFI Recognition Cancelled

TTFI Recognition Cancelled

esakal

Updated on

क्रीडा मंत्रालयाने भारतीय टेबल टेनिस महासंघाची (TTFI) मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. TTFIच्या कारभारात अनेक प्रशासकीय त्रुटी असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) तात्पुरती समिती स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रालयाने महासंघाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, TTFIकडून देण्यात आलेलं उत्तर समाधानकारक नसल्याचं सांगत क्रीडा मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com