INDvsWI : कोणापेक्षाही मयांकच्या पदार्पणाचीच जास्त चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 November 2019

निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्यांच्या अध्यक्षपदाखाली होणारी निवड समितीची ही अखेरची बैठक असेल. बांगलादेशविरुद्धची प्रकाशझोतातील कसोटी संपल्यानंतर होणाऱ्या विंडीजविरुद्धच्या ट्‌वेन्टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ निवड करताना शिखर धवनच्याही फॉर्मचा विचार केला जाईल. 

कोलकाता : एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-20 संघातील प्रमुख खेळाडू रोहीत शर्मा आता कसोटी संघातीलही नियमित सदस्य झाल्याने त्याच्यावर येणारा ताण याचे मोजमाप केले जात आहे त्यामुळे वेस्ट इंडीजविरुदध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून रोहितला विश्रांती दिली जाण्याची शक्‍यता आहे. या मालिकेसाठी उद्या संघ निवड होत आहे. 

मनू भाकरचा विश्वकरंडकात 'सुवर्ण'नेम

निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्यांच्या अध्यक्षपदाखाली होणारी निवड समितीची ही अखेरची बैठक असेल. बांगलादेशविरुद्धची प्रकाशझोतातील कसोटी संपल्यानंतर होणाऱ्या विंडीजविरुद्धच्या ेट्‌न्टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ निवड करताना शिखर धवनच्याही फॉर्मचा विचार केला जाईल. 

असा आहे कार्यक्रम 
ट्‌वेन्टी-20 मालिकेतले सामने मुंबई (6 डिसेंबर), तिरुआनंतपूरम (8 डिसेंबर) आणि हैदराबाद (11 डिसेंबर) रोजी होणार आहे तर चेन्नई (15 डिसेंबर), विशाखापठ्ठणम (18 डिसेंबर) आणि कटक (22 डिसेंबर) असा एकदिवसीय सामन्यांचा कार्यक्रम आहे. 

AUSvsPAK : कांगारुंनो सावधान! 16 वर्षांचा बछडा आलाय शिकारीला

वर्षभरात 56 सामने 
तिन्ही प्रकारांत सातत्याने खेळणारा रोहित 60 टक्के स्पर्धात्मक क्रिकेट खेळत आहे. यामध्ये आयपीएलचाही समावेश आहे. या वर्षांत रोहित शर्मा 25 एकदिवसीय 11 कसोटी आणि वीस ट्‌वेन्ट-20 सामने खेळलेला आहे. विराट कोहलीपेक्षा तीन एकदिवसीय आणि चार ट्‌वेन्टी-20 सामने अधिक खेळलेला आहे. तरिही विराटला या वर्षांत दोनदा विश्रांती देण्यात आलेली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या मालिकेनंतर भारतीय संघ जानेवारीत न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी रोहित महत्वाचा खेळाडू असेल परिणामी विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात येण्याची शक्‍यता अधिक आहे. 

धवनला वगळणार? 
रोहितला विश्रांती देण्यात आली तर दुसरा सलामीवीर अनुभवी असावा म्हणून शिखर धवनचे स्थान कायम राहू शकेल, मात्र त्याला ती अखेरची संधी असेल, असाही एक मत प्रवाह असला तरी बांगालदेशविरुदधच्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात फार प्रभावी कामगिरी करू शकला नव्हता इतकेच नव्हे तर देशांतर्गत मुश्‍ताक अली टी-20 स्पर्धेतही दुबळ्या संघांसमोर तो अपयशी ठरला होता. 

INDvsBAN : दोन्ही कसोटी सामन्यांची आकडेवारी वेगळी करावी : गावसकर

मयांक अगरवालला संधी? 
कसोटी क्रिकेटमध्ये ठसा उमटणारा मयांक अगरवाल मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये किती प्रभावी ठरू शकतो हे पहाण्यासाठी त्याची निवड अपेक्षित आहे. त्याने कर्नाटककडून खेळताना मर्यादित षटकांच्या सामन्यात आणि आयपीएलमध्येही काही सामन्यात चमक दाखवलेली आहे. 

पंतचे काय होणार? 
शिखर धवनप्रवाणे रिषभ पंतही चर्चेंचा केंद्रबिंदू असेल. बांगलादेशविरुद्धच्या ट्‌वेन्टी-20 मालिकेसाठी संघात असलेल्या संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळाली नव्हती त्यामुळे त्याला वगळले न खेळताच वगळले जाण्याची शक्‍यता कमी आहे. तसेच फॉर्म मिळवण्यासाठी पंतला देशांतर्गत स्पर्धा खेळण्यासाठी संघातून वगळले जाऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian team for West Indies series will be announced today