esakal | तेरावा मानांकित बर्डीच निशिओकाकडून पराभूत
sakal

बोलून बातमी शोधा

इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - परतीचा फटका मारताना जपानचा योशिहीतो निशीओका.

तेरावा मानांकित बर्डीच निशिओकाकडून पराभूत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - जपानच्या योशिहितो निशिओकाने इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. त्याने 13व्या मानांकित टोमास बर्डीचवर 1-6, 7-6 (7-5), 6-4 अशी मात केली. त्याने दुसऱ्या सेटच्या दहाव्या गेममध्ये एक मॅचपॉइंट वाचविला. हा सेट टायब्रेकमध्ये घालवीत त्याने बरोबरी साधली. बर्डीचने तिसऱ्या सेटच्या नवव्या गेममध्ये एक मॅचपॉइंट वाचविला. दहाव्या गेममध्ये निशिओकाने "लव्ह'ने सर्व्हिस राखली. त्याने कारकिर्दीत प्रथमच मास्टर्स स्पर्धेची चौथी फेरी गाठली. तो 21 वर्षांचा आहे.

आता त्याची स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉव्रींकाशी लढत होईल. वॉव्रींकाने जर्मनीच्या फिलिप कोलश्‍क्रायबर याच्यावर 7-5, 6-3 अशी मात केली. त्याने कारकिर्दीतील पाच सामन्यांत दर वेळी फिलीपवर मात केली आहे. या स्पर्धेत त्याला अद्याप उपांत्यपूर्व फेरी गाठता आलेली नाही. तीन ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविली असली तरी वॉव्रींकाला मास्टर्स मालिकेत एकच स्पर्धा जिंकता आली आहे. वॉव्रींकाला एकाही ब्रेकपॉइंटला सामोरे जावे लागले नाही.

अँडी मरेला हरविलेल्या वॅसेक पोस्पीसीलचे आव्हान संपुष्टात आले. त्याला सर्बियाच्या ड्युसान लॅजोविचने 7-6 (7-4), 3-6, 7-5 असे हरविले. तिसऱ्या सेटमध्ये 5-3 अशा आघाडीस विजयासाठी पोस्पीसील याला सर्व्हिस राखण्याची गरज होती, पण त्याला "लव्ह'ने ब्रेक पत्करावा लागला. दहाव्या गेममध्ये त्याने एक मॅचपॉइंट घालविला. लॅजोविचने सलग चार गेम जिंकत विजय साकार केला.

loading image