ऑलिंपिक पदक विजेता नोवाक जोकोविच याला इंडियन वेल्स ओपन या टेनिस स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. नेदरलँड्सच्या बोटिक झँडस्कल्प याने नोवाक जोकोविचचे कडवे आव्हान तीन सेटमध्ये परतवून लावत धक्कादायक निकालाची नोंद केली..पप्पा किती वेळ झाला, चला निघा आता! सामना जिंकताच Novak Djokovic ला लेकीचा इशारा, Video Viral.नोवाक जोकोविचला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती, मात्र दुसऱ्या फेरीतही त्याला मोठे यश मिळवता आले नाही. बोटिक झँडस्कल्प याने नोवाक जोकोविच याच्यावर ६-२, ३-६, ६-१ असा तीन सेटमध्ये विजय साकारला..बोटिक झँडस्कल्प याने पहिला सेट ६-२ असा जिंकत आघाडी मिळवली. त्यानंतर नोवाक जोकोविच याने पुढील सेटमध्ये ६-३ असे पुनरागमन केले, मात्र बोटिक झँडस्कल्प याने तिसऱ्या सेटमध्ये दबावाखाली खेळ उंचावला व ६-१ अशी बाजी मारली..जेतेपदापासून दूरचनोवाक जोकोविच याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर मात्र त्याला जेतेपदापासून दूरच रहावे लागत आहे. यादरम्यान त्याला दुखापतीचा सामनाही करावा लागला. बोटिक झँडस्कल्प याच्याविरुद्धच्या लढतीत नोवाक जोकोविच याने सुमार खेळ केला. याआधी त्याने पाच वेळा ही स्पर्धा जिंकण्याची किमया करून दाखवली होती..Novak Djokovic : वेदना सहन होईना! नोव्हाक जोकोविचची AUS Open च्या उपांत्य फेरीच्या लढतीतून माघार; म्हणाला, ही कदाचित....२०२२ नंतर पहिल्यांदाच तिसरी फेरीबोटिक झँडस्कल्प याला इंडियन वेल्स ओपन स्पर्धेच्या पात्रता फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता, पण ज्या खेळाडूने या स्पर्धेची पात्रता मिळवली होती. त्याने माघार घेतल्यामुळे बोटिक झँडस्कल्प याला मुख्य स्पर्धेत स्थान मिळवता आले. आता तो तिसऱ्या फेरीत पोहोचला आहे. या स्पर्धेची तिसरी फेरी त्याने २०२२ नंतर गाठली, हे विशेष.