Review of Indian Women’s Sporting Success 2025
Sakal
Women Sportsperson 2025: भारतीय महिला खेळाडूंनी गाजवले वर्ष, असा केला महिलाशक्तीचा जागर
सरत्या २०२५ या वर्षात भारतीय क्रीडा क्षेत्रात अनेक चढ-उतार झाले असले तरी हे वर्ष महिला खेळाडूंसाठी सर्वात यशासाठी लक्षात ठेवले जाईल. महिलाशक्तीचा प्रभावी ठसा म्हणूनही हे वर्ष ओळखले जाईल.
क्रिकेटपासून बुद्धिबळापर्यंत विविध खेळांत भारतीय महिलांनी विश्वविजेतेपद मिळवले. नागपूरची मराठमोठी १९ वर्षीय दिव्या देशमुख बुद्धिबळ विश्वविजेती ठरली. तसेच हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिला संघाने प्रथमच क्रिकेटमधील विश्वविजेतेपद मिळवले.
नेमबाजीत १९ वर्षीय सुरुची सिंग हिने १० मीटर एल पिस्तूल प्रकारात तब्बल चार विश्वकरंडक सुवर्णपदे मिळवली, त्यात तीन सुवर्णपदके वैयक्तिक आहेत. १० मीटरचा हा प्रकार मनू भाकरने गाजवला आहे. त्यात तिने ऑलिंपिक पदकही जिंकलेले आहे; परंतु मनू भाकरलाही मागे टाकत सुरुची सिंग अचूक लक्ष्यवेध करीत आहे.

