Indian women cricket team
Indian women cricket team

INDw vs BANw : भारतीय महिला क्रिकेट संघ चार महिन्यांनंतर मैदानात! पुढील महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार

INDw vs BANw : प्रदीर्घ ब्रेकनंतर भारतीय महिला क्रिकेट संघ पुढील महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. हरमनप्रीत कौर नेतृत्व करत असलेला भारतीय संघ अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना फेब्रुवारीत खेळला होता.

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. त्यानंतर भारतीय महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मध्येच महिलांची आयपीएल झाली हेच त्यांच्यासाठी स्पर्धात्मक क्रिकेट होते.

Indian women cricket team
Eng vs Aus : ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडला चोख प्रत्युत्तर! ख्वाजा भाऊने ठोकले शामदार शतक

पुढील महिन्यातील या दौऱ्याची माहिती बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आली नाही, तर बांगलादेश क्रिकेट मंडळाने याची वाच्यता केली. भारताविरुद्ध आम्ही व्हाईटबॉल क्रिकेटची मालिका खेळणार आहोत, सर्व सामने शेर ए बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर होतील, अशी माहिती बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या महिला विभागाचे कार्याध्यक्ष शफिऊल आलम चौधरी यांनी दिली. शेर ए बांगला स्टेडियमवर महिलांचे क्रिकेट सामने तब्बल ११ वर्षांनंतर होणार आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेतले हे सर्व सामने प्रकाशझोतात होतील.

Indian women cricket team
मिशन ODI World Cup 2023 सुरुवात! फायनलमध्ये एन्ट्री करण्यासाठी होणार टक्कर

भारतीय महिला संघ ६ जुलै रोजी ढाक्यामध्ये दाखल होईल. ९, ११, १३ जुलै या दिवशी ट्वेन्टी-२० मालिकेतील तीन सामने; तर १६, १९ आणि २२ जुलै या दिवशी तीन एकदिवसीय सामने होतील.

भारतीय महिला संघातील खेळाडू बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उच्चस्तरीय सराव करत आहेत. अकादमीचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com