Indian Women Hockey: सलीमाकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व; सविता पुनिया मागे हटल्या
Salima Tete: भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सलीमा टेटे हिने घेतले. हैदराबादमध्ये ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या विश्वकरंडक पात्रता फेरीसाठी सविता पुनियाने वैयक्तिक कारणाने माघार घेतली. भारतासह इंग्लंड, कोरिया, इटली, ऑस्ट्रिया, स्कॉटलंड, उरुग्वे व वेल्स या देशांची लढती होणार आहे.
हैदराबाद : यावर्षी होत असलेल्या महिला हॉकी विश्वकरंडकासाठीच्या पात्रता फेरीला हैदराबादमध्ये ८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी हॉकी इंडियाकडून भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा रविवारी करण्यात आली.