Renuka Singh : भारतीय महिला क्रिकेटमधील उगवत्या ताऱ्याला ICC नं केला सलाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Renuka Singh ICC Emerging Womens Cricketer of the Year 2022

Renuka Singh : भारतीय महिला क्रिकेटमधील उगवत्या ताऱ्याला ICC नं केला सलाम

Renuka Singh ICC Emerging Womens Cricketer of the Year 2022 : भारतीय महिला संघातील युवा आणि तेजतर्रार वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ही ICC Emerging Womens Cricketer of the Year 2022 ठरली आहे. रेणुकाने आपल्या वेगवान आणि स्विंग गोलंदाजीनं कमी वेळात सर्वांनाचे लक्ष वेधले होते.

झुलन गोस्वामीने निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा कोण वाहणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र काही सामन्यातच रेणुका सिंहने आपल्या प्रभावी माऱ्याने ही पोकळी भरून काढण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले.

हेही वाचा: Suryakumar Yadav: जिंकलंस भावा! ICC ने सूर्याच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा

रेणुका सिंहने ICC Emerging Womens Cricketer of the Year 2022 पुरस्काराच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिाच्या डार्सी ब्राऊन, इंग्लंडच्या एलिस कॅप्सी आणि यस्तिका भाटिया यांना मागे टाकले. रेणुकाने वनडे क्रिकेटमध्ये 14.88 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी 20 क्रिकेटमध्ये तिने 23.95 च्या सरासरीने 22 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताच्या 26 वर्षीय रेणुका सिंहसाठी 2022 हे वर्ष जबरदस्त गेले आहे. तिने 2022 मध्ये भारताकडून 29 सामने खेळत 40 विकेट्स घेतल्या आहेत. तिने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये झुलन गोस्वामीच्या निवृत्तीनंतर निर्माण झालेली पोकळी अत्यंत कमी वेळात भरून काढली.

हेही वाचा: WPL2023: महिला आयपीएलनं 2008 चे रेकॉर्ड मोडले; जय शहा म्हणाले...

रेणुकाने वनडे क्रिकेटमध्ये 14.88 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या आहेत. यातील आठ विकेट्स या इंग्लंडविरूद्धच्या दोन सामन्यात मिळवल्या आहेत. तर 7 विकेट्स या श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत घेतल्या आहेत. रेणुका सिंग चेंडू स्विंग करण्यात आणि सीम करण्यात देखील तरबेज आहे. येणाऱ्या वर्षात रेणुका सिंह ही भारताची एक हुकमी एक्का ठरू शकते.

(Sports Latest News)

हेही वाचा : 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?