WPL2023: महिला आयपीएलनं 2008 चे रेकॉर्ड मोडले; जय शहा म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women's Premier League 2023

WPL2023: महिला आयपीएलनं 2008 चे रेकॉर्ड मोडले; जय शहा म्हणाले...

Women's Premier League 2023 : महिला आयपीएलसाठी बीसीसीआयला 5 संघांसाठी फ्रेंचायजी मिळाले आहेत. भारतात खेळल्या जाणाऱ्या महिला आयपीएलचे नावही समोर आले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही माहिती दिली. भारतात खेळल्या जाणाऱ्या या लीगला महिला प्रीमियर लीग असे नाव देण्यात आले आहे.

यादरम्यान, बीसीसीआयने 2023 महिला आयपीएलसाठी यशस्वीपणे फ्रेंचायझी मिळविलेल्या पाच संघांच्या नावांची पुष्टी केली. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि लखनौचे संघ खेळणार आहे.

हेही वाचा: Women's IPL : 5 संघांसाठी बीसीसीआयला मिळाले फ्रेंचायजी; कमावला 4669.99 कोटींचा गल्ला

महिला आयपीएलचे नाव जाहीर करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी ट्विट केले की, बीसीसीआयने या लीगचे नाव महिला प्रीमियर लीग ठेवले आहे. आता हा प्रवास सुरू होतो. बीसीसीआयच्या सचिवांच्या म्हणण्यानुसार, यामुळे महिला क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल होणार आहे.

आणखी एका ट्विटमध्ये जय शाहने लिहिले की, आजचा दिवस क्रिकेटसाठी ऐतिहासिक आहे. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामासाठीच्या संघांचा विक्रमी लिलाव झाला आहे. विशेष म्हणजे 2008 मध्ये पुरूषांच्या झालेल्या आयपीएल हंगामावेळी संघांवर जेवढी बोली लागली होती त्यापेक्षाही जास्त बोली महिला आयपीएल संघांवर लागली आहे.'

जय शहा ट्विट करत म्हणाले की, 'ही महिला क्रिकेटमधील एक क्रांती आहे. यामुळे फक्त महिला क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलणार नाहीये तर संपूर्ण खेळ जगतात मोठे बदल होणार आहेत. महिला आयपीएल महिला क्रिकेटमध्ये मोठे बदल घडवून आणेल. यामुळे महिला क्रिकेटमधील सर्व घटकांना फायदा होणार आहे.'