17 वर्षीय शफाली आता सिडनीसाठी सिक्सर मारताना दिसणार

ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगमध्ये ती सिडनी सिक्सरकडून खेळणार आहे.
Shafali Verma
Shafali Verma File Photo

भारतीय महिला संघात सेहवागच्या शैलीत बिनधास्त फटकेबाजी करणारी शफाली वर्माचा (Shafali Verma ) धमाका आता ऑस्ट्रेलियन लिगमध्ये पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियन वुमन बिग बॅश लीग Women's Big Bash League (WBBL) मध्ये ती सिडनी सिक्सरकडून खेळणार आहे. ईएसपीएनच्या वृत्तानुसार शफाली सिडनी सिक्सरसोबत करारबद्ध झाली आहे. तिच्यासह राधा यादवही ऑस्ट्रेलियन लीगचा भाग असेल. शफाली सिडनी सिक्सरकडून खेळणार असल्याच्या वृत्ताला तिचे वडील संजीव वर्मा यांनी दुजोरा दिलाय. (Indian Women young opener Shafali Verma signs WBBL contract with Sydney Sixers)

लेकीला ऑस्ट्रेलियन लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल संजीव वर्मा यांनी बीसीसीआय आणि हरियाणा क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले आहेत. हरियाणा क्रिकेट असोसिएशनने शफालील योग्य मार्गदर्शन दिले. त्यामुळेच ती यशस्वी ठरली, असेही ते म्हणाले.

Shafali Verma
रमेश पोवार पुन्हा कोच; मितालीने केला होता गंभीर आरोप

भारतीय संघाची स्फोटक युवा फलंदाज अशी ओळख निर्माण करणारी शफाली यापूर्वी द हंड्रेड (The Hundred) स्पर्धेत खेळणार असल्याचे समोर आले होते. भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रित कौर, उप कर्णधार स्मिती मानधना, जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ति शर्मा आणि शफाली द हंड्रेड या स्पर्धेत खेळणार आहेत. शफाली बर्मिंघम फिनिक्स संघाकडून मैदानात उतरणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे द हंड्रेड स्पर्धा ही पुढे ढकलण्यात आली आहे.

Shafali Verma
कॅप्टन्सीच्या दुखण्यावरील 'पेन किलर' स्मिथला दिलासा देणारी

कोरानाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्रीडा क्षेत्रात संकटाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय महिला क्रिकेटला मोठा फटका बसला असून काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिका महिला संघ भारत दौऱअयावर आला होता. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी निराशजनक राहिली होती. बीसीसीआय दुसऱ्या देशातील लीगमध्ये सहभागी होण्याची परवानगी आपल्या खेळाडूंना सहजासहजी देत नाही. पण महिला क्रिकेटर याला अपवाद आहेत. त्यामुळे शफालीसह अन्य खेळाडूंना इतर देशातील स्पर्धेत खेळणे शक्य होत आहे.

शफाली वर्मा (Shafali Verma) सध्याच्या घडीला महिला टी-20 रँकिंगमध्ये अव्वलस्थानी आहे. त्यामुळेच इंग्‍लंडच्या हंड्रेड लीगसह आता तिला ऑस्ट्रेलियन बिग बॅश लिगकडूनही ऑफर आल्याचे पाहायला मिळते. या स्पर्धेत तिची फटकेबाजी निश्चितच पाहण्याजोगी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com