INDvsNZ : स्मृती, रॉड्रीग्जच्या तडाख्यात न्यूझीलंडचा धुव्वा

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 जानेवारी 2019

भारताच्या सलामीवीर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या तुफान टोलेबाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंडवर 9 गडी राखून विजय मिळविला. 

नेपीयर : भारताच्या सलामीवीर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या तुफान टोलेबाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंडवर 9 गडी राखून विजय मिळविला. 

नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 192 धावांत रोखले. एकता बिश्त, पुनम यादव आणि दिप्ती शर्मा यांच्या गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडचा डाव 48.4 षटकांत संपुष्टात आला. 

त्यानंतर फलंदाजीला आल्यावर सलामीवीर स्मृती आणि रॉड्रिग्ज यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा यथोचित समाचार घेतला. विजयासाठी अवघ्या तीन धावांची गरज असताना स्मृती शतक झळकावून बाद झाली. त्यानंतर रॉड्रीग्ड आणि दिप्ती शर्मा यांनी विजयाची औपचारिकचा पार पाडली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian womens cricket team wins against New Zealand