
Asian Champions Trophy
sakal
हँगझोऊ (चीन) : भारतीय महिला हॉकी संघाची आशियाई करंडकातील विजयी मालिका बुधवारीही कायम राहिली. भारतीय महिला हॉकी संघाने मागील स्पर्धेतील उपविजेत्या दक्षिण कोरियन संघावर ४-२ असा विजय मिळवला व ‘सुपर फोर’ फेरीमध्ये तीन गुणांची कमाई केली. वैष्णवी फाळके, संगीताकुमारी, लालरेमसियामी व ऋतुजा पिसाळ यांनी गोल करीत भारतीय महिला संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.