

Spain's World Cup Hero Ferran Torres India Connection
Sakal
FIFA World Cup 2026 Final: अमेरिकेतील न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियमवर तब्बल १६ वर्षांनंतर स्पेनला विश्वकरंडक जिंकून देणारा मौल्यवान गोल २६ वर्षीय ‘सुपर सब’ फेरान टोरेस याने (Ferran Torres) १०६व्या मिनिटास केला, तोच सामन्याचा मानकरीही ठरला. या आक्रमक शैलीच्या फुटबॉलपटूने नऊ वर्षांपूर्वी भारतीय मैदाने गाजविली होती, तसेच नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर गोलही नोंदविला होता.