

PV Sindhu, Lakshya Sen Exit Indonesia Open, India Out of Tournament
Sakal
जकार्ता: भारतीय खेळाडूंचे इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. पुरुष एकेरी विभागात लक्ष्य सेन याचा, तर महिला एकेरी विभागात पी. व्ही. सिंधू हिचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. यामुळे भारताच्या विजेतेपदाच्या आशांना सुरुंग लागला.