Krida : भारताचा ‘गोल’ धडाका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sports

भारताचा ‘गोल’ धडाका

भुवनेश्‍वर : सलामीच्या लढतीत फ्रान्सकडून ५-४ अशा फरकाने पराभूत झालेल्या यजमान भारतीय हॉकी संघाने गुरुवारी कॅनडाविरुद्ध खेळताना गोलचा धडाका लावला. भारताने कॅनडाविरुद्ध चक्क १३ गोलचा पाऊस पाडला. भारताने कॅनडावर १३-१ अशा फरकाने दणदणीत विजय मिळवला. आता ‘ब’ गटामध्ये फ्रान्सचा संघ दोन विजय व सहा गुणांसह पहिल्या स्थानावर असून भारतीय संघ एका विजयातील तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

भारताने तिसऱ्या मिनिटाला गोलचा पाऊस पाडायला सुरुवात केली. अखेर ५९ व्या मिनिटांपर्यंत हा सिलसिला सुरू राहिला. उत्तम सिंगने तिसऱ्या व ४७ व्या मिनिटाला गोल केले. संजयने १७ व्या, ३२ व्या व ५९ व्या मिनिटाला गोल करीत आपला फॉर्म याही लढतीत कायम ठेवला. अरायजीत हुंदलने ४० व्या, ५० व्या व ५१ व्या मिनिटाला गोल करीत दमदार हॅट्‍ट्रिक साजरी केली. विवेक सागर प्रसादने आठव्या मिनिटाला, मनिंदर सिंगने २७ व्या मिनिटाला, शरदानंद तिवारीने ३५ व्या व ५३ व्या मिनिटाला आणि अभिषेक लकराने ५५ व्या मिनिटाला गोल करीत भारताच्या महाविजयावर शिक्कामोर्तब केले. आता भारताचा पुढील सामना २७ नोव्हेंबरला पोलंडशी होणार आहे. याच गटातील अन्य लढतीत फ्रान्सने पोलंडचा ७-१ अशा फरकाने धुव्वा उडवला व सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घातली.

loading image
go to top