esakal | ISSF Junior World Championship : देशाच्या 14 वर्षीय लेकीचा सुवर्ण वेध, अनुभवी नेमबाजात ठरली भारी!
sakal

बोलून बातमी शोधा

Naamya Kapoor

देशाच्या 14 वर्षीय लेकीचा सुवर्ण वेध,अनुभवी नेमबाजात ठरली भारी!

sakal_logo
By
सुशांत जाधव

ISSF Junior World Championship : भारताची 14 वर्षीय नेमबाज नामया कपूरने (Naamya Kapoor) नवा इतिहास रचला आहे. आयएसएसएफ ज्यूनियअर वर्ल्ड चॅम्पियनशिप ISSF Junior World Championship स्पर्धेतील 25 मीटर पिस्टल प्रकारात तिने सुवर्ण वेध साधला. याच इवेंटमध्ये मनू भाकेरला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. नामयाने फायनलमध्ये 36 गुण मिळवत फ्रान्सच्या कॅमिली जेदरेज्यूस्की (33 गुण) मागे टाकले. अंतिम फेरीत आठ स्पर्धकांमध्ये मनू भाकेरसह अनुभवी नेमबाजांना मागे टाकत नामयानं आपल्यातील क्षमता दाखवून दिली.

भारताची 19 वर्षीय ऑलिम्पियन मनू भाकेरने 31 गुणांसह कांस्य पदक पटकावले. भाकेरने या कांस्य पदकाशिवाय तीन सुवर्ण पदक पटकावली आहेत. भारताची रिदम सांगवान 25 मीटर पिस्टल क्रीडा प्रकारता चौथ्या स्थानावर राहिली. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत 7 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य पदकासह एकूण 16 पदकांची कमाई केली आहे. ऑलिम्पिकनंतर ही मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत 32 देशातील जवळपास 370 नेमबाजांनी भाग घेतला आहे.

हेही वाचा: MI vs RR : मुंबई इंडियन्सला आज अखेरची संधी

दिल्लीची नेमबाज नामया कपूरची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या ट्रायलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहत तिने भारतीय संघात स्थान मिळवले होते. नामया दिल्लीतील राजोरी गार्डन येथील रहिवासी आहे. मागील तीन वर्षांपासून मोठी बहिण खुशीसोबत ती सराव करते. राजोरी गार्डने ते फरिदाबाद असा दररोज तीन ते चार तासांचा ट्रेनचा प्रवास करुन ती रेंजवर मेहनत घेते. भारताबाहेर पहिल्यांदाच ती एकटी एखाद्या स्पर्धेसाठी गेली आहे.

हेही वाचा: VIDEO : बाराव्या खेळाडूमुळे चेन्नईचे वाजले बारा!

loading image
go to top