Indonesia Masters : लक्ष्य सेनची उपांतपूर्व फेरीत धडक

Indonesia Masters Super 500 badminton tournament Lakshya Sen Reached In Quarter Final
Indonesia Masters Super 500 badminton tournament Lakshya Sen Reached In Quarter Final esakal

जकार्ता : जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या लक्ष्य सेनने इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. लक्ष्य सेनने डेन्मार्कच्या रासमुस गेमकेचा सरळ गेममध्ये पराभव करत पुढची फेरी गाठली. मुळचा अल्मोराचा असलेल्या 20 वर्षाच्या लक्ष्य सेन हा एतिहासिक थॉमस कप विजेतेपद जिंकणाऱ्या भारतीय संघाचा देखील सदस्य होता. (Indonesia Masters Super 500 badminton tournament Lakshya Sen Reached In Quarter Final)

Indonesia Masters Super 500 badminton tournament Lakshya Sen Reached In Quarter Final
टीम इंडियाच्या ताफ्यात अजब योगायोग, एका वर्षात बदलले अर्धा डझन कर्णधार

लक्ष्य सेनने गेमकेचा 21 - 18, 21 - 15 असा सरळ सेटमध्ये अवघ्या 54 मिनिटात पराभव केला. क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असणारा लक्ष्य आता उपांत्यपूर्व फेरीत तैवानच्या तिसऱ्या सिडेड चोऊ टीन चेन याच्याशी लढत होणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या थॉमस कपच्या लढतीत लक्ष्य सेनला चेनने तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात पराभूत केले होते.

दरम्यान, इंडोनेशिया मास्टर्समध्ये लक्ष्य सेन आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दित पहिल्यांदाच गेमके विरूद्ध खेळला. लक्ष्यने पहिल्या गेममध्ये 0-3 अशा खराब सुरूवातीनंतर 9-6 अशी आघाडी घेतली. त्यानंतर गेमकेने झुंजार खेळी करत 11-10 अशी एका गुणाची आघाडी घेतली. त्यानंतर लक्ष्यने सलग सहा गुण मिळवत 16-12 अशी आघाडी घेतली. अखेर लक्ष्यने पहिला गेम 21 - 18 असा जिंकला.

Indonesia Masters Super 500 badminton tournament Lakshya Sen Reached In Quarter Final
Ranji Trophy: मुंबईने 93 वर्ष जुना विक्रम मोडून रचला इतिहास

दुसऱ्या गेममध्ये देखील गेमके आणि सेन यांच्यात गुण मिळवण्यात मोठी चुरस दिसली. मात्र लक्ष्य सेनने अखेरच्या क्षणी खेळ उंचावत सलग गुणांची कमाई केली. सेनने दुसरा गेम 21 - 15 ने जिंकत सामना खिशात टाकला. आता इंडोनेशिया मास्टर्समध्ये भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू इंडोनेशियाच्या जॉर्जिया मरिस्का टुनजूंग हिच्यासोबत भिडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com