epicaricacy! टीम इंडियाला शुभेच्छा देताना थरुर यांनी वापरला खास डिक्शनरी 'वर्ड'

shashi tharoor 1.png
shashi tharoor 1.png

नवी दिल्ली- ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमधील गाबा येथे झालेल्या अखेरच्या कसोटीत ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर भारतीय क्रिकटे टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रीडा, राजकारण आणि चित्रपट सृष्टीसह सर्वच क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींनी या विजयानिमित्त टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनीही यानिमित्त टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत, त्याही आपल्या विशेष अंदाजात. थरुर यांनी आपल्या टि्वटमध्ये ऑस्ट्रेलियाला टोले लगावले आहेत. यासाठी त्यांनी इंग्रजीमधील एक असा शब्द वापरला आहे, जो कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असेल. 

शशी थरुर कधी-कधी आपल्या टि्वटमध्ये इंग्रजीतील अशा शब्दांचा वापर करतात, ज्याचा अर्थ समजून घेण्यासाठी अनेकांना डिक्शनरीची मदत घ्यावी लागते. शशी थरुर यांनी मंगळवारी आपल्या टि्वटमध्येही अशाच एका शब्दाचा वापर केला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात भारताने विजय मिळवल्यानंतर थरुर यांनी अनेक टि्वट केले आणि टीम इंडियाचे कौतुक केले. 

त्याचबरोबर त्यांनी पहिल्या कसोटीतील भारताच्या लाजीरवाण्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क वॉ, रिकी पाँटिंग आणि इतर खेळाडूंनी केलेल्या कमेंटचा स्नॅपशॉट शेअर केला. पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा डाव 36 धावांत आटोपला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी टीका करताना या मालिकेत टीम इंडियाचा दयनीय अवस्था होईल, अशी टीका केली होती. 

'इपिकॅरिकेसी' शब्दाचा केला वापर
चौथ्या कसोटीतील भारताच्या विजयानंतर थरुर यांनी आपल्या एका टि्वटमध्ये 'इपिकॅरिकेसी' या शब्दाचा वापर केला. दुसऱ्याला झालेला त्रासाचा किंवा वाईट घटनेचा आनंद व्यक्त करणे असा या शब्दाचा अर्थ आहे. आपल्या दुसऱ्या एका टि्वटमध्ये त्यांनी म्हटले की, मी वाईट दृष्टीने पाहणाऱ्या लोकांप्रमाणे नाही. परंतु, आज या कमेंट्स वाचल्यानंतर मला एक वेगळ्या पद्धतीचा आनंद होत आहे. 

अजिंक्य रहाणेचं कौतुक
शशी थरुर यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कवर निशाणा साधताना म्हटले की, मायकल क्लार्क बरोबर बोलत आहेत..पुढच्या महिन्यात इंग्लंडच्या टीमवर प्रहार करताना जल्लोष साजरा करण्यास सुरुवात करा. क्लार्कने म्हटले होते की, विराटशिवाय जर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर आपण संपूर्ण वर्षभर जल्लोष करु. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणि ऍडिलेड कसोटीतील पराभवानंतर कर्णधारपद सांभाळणाऱ्या अंजिक्य रहाणेची थरुर यांनी कौतुक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com