esakal | INDvsAUS: ब्रिस्बेनमधील विजयानंतर रहाणेने नॅथन लॉयनला दिली खास भेट, पाहा VIDEO
sakal

बोलून बातमी शोधा

ajinkya rahane lyon.png

ब्रिस्बेन कसोटीत विजय मिळवत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करुन बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.

INDvsAUS: ब्रिस्बेनमधील विजयानंतर रहाणेने नॅथन लॉयनला दिली खास भेट, पाहा VIDEO

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- ऑस्ट्रेलियाविरोधात ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर टीम इंडियाचे जगभरातून कौतुक केले जात आहे. टीमने ब्रिस्बेन कसोटीत विजय मिळवत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करुन बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. ब्रिस्बेन कसोटी सामना ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन लायनसाठीही खास होता. हा त्याचा 100 वा कसोटी सामना होता. विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने स्वतःची स्वाक्षरी असलेली जर्सी नॅथनला भेट दिली. 

ब्रिस्बेनमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका पुन्हा एकदा आपल्या नावे केली. सामन्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणने 100 वा कसोटी सामना खेळत असलेला ऑस्ट्रेलियन स्पिनर नॅथन लॉयनला स्वतःची सही असलेली जर्सी भेट दिली. नॅथनच्या 100 व्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाकडून स्वाक्षरी असलेली जर्सी देत आहे, असे टी शर्ट देताना रहाणे म्हणाला. नॅथनने 100 कसोटीत 399 विकेट घेतल्या आहेत. त्याला या कसोटीत 400 विकेट घेण्याची संधी होती. 

हेही वाचा- ब्रिस्बेन टू संगमनेर विजयाचा गोडवा; अजिंक्यच्या आजीसोबत गावकऱ्यांचा आनंदोत्सव

टीम इंडियाच्या या खिलाडीवृत्तीचे कौतुक माजी कसोटीपटू व्हीव्हीएसएस लक्ष्मण यांनीही केले आहे. नॅथनच्या 100 कसोटीनिमित्त एक खास भेट देऊन टीम इंडियाने खेळाप्रतीची एक चांगली भावना दाखवली आहे. खिलाडीवृत्तीचे हे एक शानदार उदाहरण आहे, असे लक्ष्मण यांनी म्हटले आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर मालिकेत जबरदस्त पुनरागमन केले. त्यामुळे टीम इंडियासाठी हा विजय खूप खास आहे. टीम इंडियाचे अनेक प्रमुख खेळाडू जायबंदी असल्यामुळे संघाबाहेर असतानाही मोठा विजय मिळवला आहे. 

हेही वाचा- अजिंक्य म्हणतोय, अश्रूंची किंमत गोड! शास्त्रींनी मराठीत पुजाराला दिली 'बॅटल मॅन'ची उपमा

loading image