Women's T20 World Cup : 'छोरीयां छोरोंसे कम नहीं'; भारताचा बांग्लादेशवर विजय!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

प्रथम फलंदाजी मिळालेल्या भारताला शेफाली वर्माने 'सेहवाग' स्टाईल झंझावाती सुरुवात करून दिली. पर्थच्या सीमारेषा इतर मैदानापेक्षा लांबवर असल्या तरी तिने षटकारांची भाषा सुरु केली.

INDvsBAN Womens : पर्थ : शेफाली वर्माची तडाखेंबद फलंदाजी आणि त्यानंतर पुन्हा एकदा पूनमची जादुई फिरकी गोलंदाजी यामुळे भारतीयांनी महिला ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला 18 धावांनी हरवले. स्पर्धेतला सलग दुसरा विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेने ठाम पाऊल टाकले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेफालीच्या वेगवान 39 धावांच्या सुरुवानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 142 धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशला 8 बाद 124 धावांत रोखले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 विकेट मिळवणाऱ्या पूनमने आज 18 धावांत 3 बळी अशी कामगिरी केली शिखा पांडे आणि अरुंधती रेड्डी यांनीही दोन विकेटचे योगदान दिले.

- INDvsNZ : कोहली म्हणतो पराभवाची लाज कशाला?

भारताची 142 ही धावसंख्या या स्पर्धेतली आत्तापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या होती. बांगलादेशकडून मूर्शिदा खातून आणि निगर सुलताना यांनी तिशीच्या पलीकडे मजल मारून प्रतिकार कायम ठेवला, पण भारतीय गोलंदाजांनी महत्वाच्या क्षणी विकेट मिळवत पकड कायम ठेवली. पूनम यादव गोलंदाजीस आल्यावर बांगलादेशच्या डावाला ब्रेक लागला. 

अखेरच्या 12 चेंडूत 35 धावांची गरज असताना रुमाना अहमदने दोन चौकार मारून 10 चेंडूत 25 असे समिकरण केले होते, पण पूनम आणि शिखा यांनी भारताचा विजय सुकर केला.

शेफालीचा तडाखा

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी मिळालेल्या भारताला शेफाली वर्माने 'सेहवाग' स्टाईल झंझावाती सुरुवात करून दिली. पर्थच्या सीमारेषा इतर मैदानापेक्षा लांबवर असल्या तरी तिने षटकारांची भाषा सुरु केली. स्मृती मानधनाच्या अनुपस्थितीत सलामीला खेळणारी तानिया भाटिया अवघ्या दोन धावांवर परतली असली तरी शेफालीवर त्याचा परिणाम झाला नाही. खणखणीत चार षटकार आणि दोन चौकारंसह तिने दोनशेपेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 39 धावा केल्या. अखेर एक उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात ति बाद झाली.

- 'तू चेंडू कुरतडला'; म्हटल्यावर भाऊ गेला ना अंगावर धावून; पीएसएलमध्ये नुसता राडा

दुसऱ्या बाजूला जेमिमा रॉड्रिग्जही शानदार खेळी सजवत असताना कर्णधार हरमनप्रीत कौरने निराशा केली ति सुद्धा एकेरी धावांत बाद झाली. 14 व्या षटकांत जेमिमा धावचीत झाल्यावर भारतीच्या वेगाला ब्रेक लागला.

वेदाचे निर्णायक योगदान

या दरम्यान बांगलादेशी खेळाडूचे क्षेत्ररक्षण चपळ होते. धावा घेताना भारतीयांचा ताळमेळ चुकत होता. पण सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या वेदा कृष्णमृर्तीने 11 चेंडूत नाबाद 20 धावांचा तडाखा दिला त्यामुळे भारताला 142 धावांपर्यंत मजल मारता आली. 

- मॅच फिक्सिंग प्रकरणात आयसीसीकडून 'या' खेळाडूवर 7 वर्षांची बंदी

संक्षिप्त धावफलक : 

भारत : 20 षटकांत 6 बाद 142 (शेफाली वर्मा 39 -17 चेंडू, 2 चौकार, 4 षटकार, जेमिमा रॉड्रिग्ज 34 -37 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, दीप्ती शर्मा 11, रिचा घोष 14, वेदा कृष्णमूर्ती नाबाद 20 -11 चेंडू, 4 चौकार, सलमा खातून 25-2, पन्ना घोष 25-2) वि. वि बांगलादेश : 20 षटकांत 8 बाद 124 (मूर्शिदा खातून 30 -26 चेंडू, 4 चौकार, निगर सुलताना 35 -26 चेंडू, 5 चौकार, फहिमा खातून 17 -13 चेंडू, 2 चौकार, शिखा पांडे 14-2, अरुंधती रेड्डी 33-2, पूनम यादव 18-3)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDvsBAN Womens T20 World Cup India Beat Bangladesh By 18 Runs In Perth