esakal | INDvsNZ : पृथ्वी-मयांक पदार्पणात अपयशी पण भारतीय संघ...

बोलून बातमी शोधा

cricket

ट्‌वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धा असलेल्या वर्षातील पहिल्या एकदिवसीय लढतीत सलामीला प्रयोग करणे भारतीय संघास भाग पडले आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन हे एकदिवसीय लढतीतील नियमित सलामीवीर जखमी आहेत.

INDvsNZ : पृथ्वी-मयांक पदार्पणात अपयशी पण भारतीय संघ...
sakal_logo
By
वृत्तसंस्था

हॅमिल्टन : पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या पूर्णपणे नव्या सलामीच्या जोडीसह भारतीय संघ आज (बुधवार) नव्या वर्षातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात उतरला. मात्र, या दोन्ही सलामीवीरांना अपयश आले असले तरी भारतीय संघाने शतकी मजल गाठली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्‌वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धा असलेल्या वर्षातील पहिल्या एकदिवसीय लढतीत सलामीला प्रयोग करणे भारतीय संघास भाग पडले आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन हे एकदिवसीय लढतीतील नियमित सलामीवीर जखमी आहेत. के. एल. राहुल संघात असला तरी त्याच्याकडे यष्टिरक्षणाचीही जबाबदारी आहे, त्यामुळे तो पाचव्या क्रमांकावरच खेळणार असल्याचे कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल यांना वनडेत पदार्पणाची संधी मिळाली.

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी आणि मयांक यांनी डावाची आक्रमक सुरवात केली. पण, मोठी खेळी करण्यात या दोघांनाही अपयश आले. पृथ्वी 20 धावांवर यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. तर, मयांकही फटकेबाजीच्या प्रयत्नात 32 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरत संघाची धावसंख्या शंभरच्या पार नेली.