
न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या पूर्णपणे नव्या सलामीच्या जोडीसह भारतीय संघ आज (बुधवार) नव्या वर्षातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात उतरला. पृथ्वी आणि मयांक यांनी डावाची आक्रमक सुरवात केली. पण, मोठी खेळी करण्यात या दोघांनाही अपयश आले.
हॅमिल्टन : श्रेयस अय्यरचे शतक आणि विराट कोहली, केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 348 धावांचे आव्हान ठेवले आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या पूर्णपणे नव्या सलामीच्या जोडीसह भारतीय संघ आज (बुधवार) नव्या वर्षातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात उतरला. पृथ्वी आणि मयांक यांनी डावाची आक्रमक सुरवात केली. पण, मोठी खेळी करण्यात या दोघांनाही अपयश आले. पृथ्वी 20 धावांवर यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. तर, मयांकही फटकेबाजीच्या प्रयत्नात 32 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरत संघाची धावसंख्या शंभरच्या पार नेली. विराट या सामन्यात मोठी खेळी करेल असे वाटत असताना सोधीच्या गोलंदाजीवर 51 धावांवर तो त्रिफळाबाद झाला.
यानंतर आलेल्या आणि फॉर्ममध्ये असलेल्या राहुलने श्रेयसच्या साथीने भारताच्या धावसंख्येत झटपट वाढ केली. या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला तिनेश धावांपर्यंत मजल मारून दिली. श्रेयसने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकाविले. राहुलने आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडविले. श्रेयस 103 धावांवर बाद झाल्यानंतर केदारने राहुलला साथ देत आक्रमक फलंदाजी केली. राहुलने 64 चेंडूत 88 धावांची, तर केदारने 15 चेंडूत 26 धावा केल्या.