esakal | VIDEO : विराट गारठला! रोहितने कशी दिली रिअ‍ॅक्शन पाहाच
sakal

बोलून बातमी शोधा

IND v NZ

VIDEO : विराट गारठला! रोहितने कशी दिली रिअ‍ॅक्शन पाहाच

sakal_logo
By
सुशांत जाधव

ICC World Test Championship Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लढत साउदम्टनच्या मैदानात सुरु आहे. दोन्ही संघातील खेळापेक्षा पावसाने अधिक काळ बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले. पाचव्या दिवशी देखील खेळ थोडा उशीराच सुरु झाला. इंग्लंडमधील साउदम्टनमधील खराब वातावरणामुळे कसोटी बेरंग झाली असताना फिल्डिंगवेळी विराट कोहली आपल्या हटके अंदाजाने चाहत्यांचे मनोरंजन करातना पाहायला मिळाले.

पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरु झाल्यानंतर विराट कोहली खूप थंडी वाजत आहे, अशी हावभाव करताना दिसला. यावेळी रोहित शर्माने हातवारे करुन दिलेली रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतीये. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली स्लिपमध्ये फिल्डिंग करताना दिसते. थंडी वाजत असल्यामुळे तो दोन्ही एकमेकांवर घासत असल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या या कृत्यामुळे सामदम्टनमधील वातावरणाचा अंदाजही येतो. यावेळी रोहित शर्मा त्याच्याकडे हातवारे करताना पाहायला मिळते. यापूर्वी विराट कोहली फिल्डिंग दरम्यान भांगडा करताना पाहायसला मिळाले होते.

भारतीय संघाने पहिल्या डावात 217 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने संघाच्या डावाला चांगली सुरुवात करुन दिली. पण मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. त्याने संघाच्या धावात 34 धावांची भर घातली. विराट कोहलीने अजिंक्य रहाणेच्या साथीने डावाला आकार दिला. कोहलीलाही मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. पण तो 44 धावांवर बाद झाला. पहिल्या डावात एकाही भारतीय फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. न्यूझीलंडचा सलामीवीर डेवोन कॉन्वे याने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पहिले वहिले अर्धशतक झळकावले.

loading image