INDvWI : हेटमायर-होपने टीम इंडियाला आणले जमिनीवर!

INDvWI-Hetmyer-Hope
INDvWI-Hetmyer-Hope

चेन्नई : मुंबईत ट्वेन्टी-20 मालिका विजय मिळवताना टेकऑफ घेतलेले टीम इंडियाचे विमान त्याच वेस्ट इंडीज संघाविरुद्ध चेन्नईत जमिनीवर आले. परिणाणी एकदिवसीय मालिकेच्या सलामीलाच पुरेशा धावा करूनही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. भारतीयांना नेहमीच जोईजोड होणाऱ्या हेमायरने शतकी (139)  खेळी करत विराटच्या संघाला विचारही करू दिला नाही. हा सामना विंडीजने आठ विकेटने जिंकला.

गतवर्षीच्याही मायदेशातील मालिकेत हाच हेटमायर भारतीय गोलंदाजांना भारी ठरला होता. यंदाही त्याने भारतीय गोलंदाजांना निरुत्त करत शानदार शतक केले त्यामुळे 288 धावांचे आव्हान पार करण्यासाठी वेस्ट इंडीजला फार शर्थ करावी लागली नाही.

ट्वेन्टी-20 मालिका भारताने जिंकली असली तरी गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. आता एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात एकट्या हेटमायरने भारतीय गोलंदाजांना शरण आणले. शेय होपसह त्याने 207 चेंडूत 218 धावांची भागीदारी केली त्यात हेटमायरचा वाटा 139 धावांचा होता. त्यामंतर होपनेही शतकी खेळी साकार केली.

वेस्ट इंडीजकडून कमीत कमी (38)  सामन्यात पाच शतके करण्याचा पराक्रम करताना त्याने या विक्रमात गॉर्डन ग्रीनिज (52)  व्हिव रिचर्डस् (54), ख्रिस गेल (66) आणि ब्रायन लारा (83) या ग्रेट खेळाडूंना मागे टाकले. अशी गुणवत्ता असलेल्या हेटमायरने 11 चौकार सात षटकार अशी आतषबाजी केली.
वेस्ट इंडीजचा दुसरा सलामीवीर आम्ब्रिजला पाचव्या षटकांत बाद करण्यात आले त्यानंतर भारताला विजय मिळवता येईल असा वेळ कधीच आली नाही.  गोलंदाजांचे अपयश त्यात क्षेत्ररक्षकांच्या चुका पुन्हा एकदा भारतीयांच्या मुळावर आल्या.

भारताची खराब सुरुवात

तीन दिवसांपूर्वी मुंबईत या दोघांनी घणाघाती सलामी दिली होती आज मात्र संथ खेळपट्टीमुळे 21 धावांवरच ही जोडी फुटली. राहुल सहव्या षटकात बाद झाला परंतु त्यापेक्षा भारताला मोठा धक्का पुढच्या षटकात बसला कॉड्रेलनने विराट कोहलीलाही अवघ्या चार धावांवर बाद केले. दुसऱ्या बाजुला रोहित शर्माने टायमिंगची जुळवाजुळव करून सहा चौकारांसह 36 धावांची खेळी केली परंतु तोही बाद झाला तेव्हा 18 षटकांचाच खेळ झाला होता. 

श्रेयस-रिषभने डाव सावरला

तीन प्रमुख फलंदाज 80 धावांत परतल्यावर पुढच्या फलंदाजाना संयमावर भर देणे अपरिहार्य होते. श्रेयस अय्यरने या पडझडीत संघाची धुरा सांभांळली पण त्याने धावांची गती कोठेही कमी होऊ दिली नाही. दुसऱ्या बाजूला रिषभ पंतनेही चांगलाच संयम दाखवला. एरवी परिस्थिती कशीही असली तरी उतावीळ फटका मारून विकेट गमावणारा पंत आज संतुलीत दिसून आला. तरिही अय्यर-पंत यांनी शतकी भागीदारीसाठी 103 चेंडू घेतले. 

जम बसल्यावर पंतने आपली हुकमी फटकेबाजी सुरु केली. यावेळी त्याच्यासह अय्यरकरूनही शतकाची अपेक्षा होती, परंतु अय्यरही रोहितप्रमाणे कमी वेगाने आलेल्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर पंत षटकाराच्या प्रयत्नात माघारी फिरला. पण या दोघांनी संघाची धावसंख्या अडीचशे पार जाईल याची पायाभरणी केली. त्यानंतर केदार जाधवच्या फटकेबाजीमुळे 288 धावापर्यंत भारताला मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक : 

भारत 50 षटकांत : 8 बाद 287 (रोहित शर्मा 36 -56 चेंडू, 6 चौकार, केएल राहुल 6, विराट कोहली 4, श्रेयस अय्यर 70 -88 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, रिषभ पंत 71 -69 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, केदार जाधव 40 -35 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, रवींद्र जडेजा 21 -21 चेंडू, 2 चौकार,  शेल्डन कॉट्रेल 10-3-46-2, कीमो पॉल  7-0-41-2, अलझारी जोसेफ 9-1-45-2) पराभूत. वि. वेस्ट इंडीज : 47.5 षटकांत 2 बाद 291  (शेय होप  नाबाद 102 -151 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, शिमरॉन हेटमायर 139 -106 चेंडू, 11 चौकार, 7 षटकार,  दीपक चहर 10-1-48-1)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com