INDvWI : विंडीजपुढे 171 धावांचे आव्हान; शिवम दुबेने झळकावले पहिले T-20 अर्धशतक!

टीम ई-सकाळ
रविवार, 8 डिसेंबर 2019

कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर शिवम दुबेला बढती दिली. याचा फायदा घेत शिवमने आपल्या टी-20 कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साजरे केले.

तिरुअनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये येथे सुरू असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने विंडीजपुढे 170 धावांचा डोंगर उभारला.

-  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा विंडीज कर्णधार किरॉन पोलार्डचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवत भारताला 170 धावांमध्ये रोखले. शिवम दुबेव्यतिरिक्त एकही भारतीय फलंदाज मोठी खेळी करण्यात यशस्वी झाला नाही. विंडीजतर्फे हेडन वॉल्श आणि केजरिक विल्यमस यांनी प्रत्येकी 2, तर पेरी, शेल्डन कोट्रेल आणि जेसन होल्डरने यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.

- ऑस्ट्रेलियाची नाचक्की; मेलबर्न मैदानाच्या लौकीकाला पुन्हा धक्का

फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना डावाची सुरवात करण्यात यश मिळाले नाही. लोकेश राहुलला वॉल्शने बाद करत भारताला पहिला धक्का दिला. रोहित शर्माही काही वेळात तंबूत परतला. कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर शिवम दुबेला बढती दिली. याचा फायदा घेत शिवमने आपल्या टी-20 कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साजरे केले.

- INDvWI : 'सर, तुमचा डायलॉग आवडला'; बिग बींच्या ट्विटला विराटचे उत्तर!

दुबे आणि कोहली बाद झाल्यानंतर भारतीय खेळाडूंची गळती सुरू झाली. आणि ठराविक अंतराने ते एकापाठोपाठ एक बाद होत गेले. अखेर 20 षटकांत भारताने 7 गड्यांच्या मोबदल्यात 170 धावांची मजल मारली.

- विराट एनकाऊंटर स्पेशालीस्ट

पहिल्या सामन्यात दोनशे धावांचा आकडा पार केलेल्या विंडीजपुढे हे आव्हान तसे माफक असावे, असे वाटत आहे. मात्र, भारतीय गोलंदाज त्यांना थोपवण्यात यशस्वी ठरतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDvWI Shivam Dube first 50 helps Team India post 170 score