पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी टीम इंडियासमोर मोठे आव्हान: INDW vs PAKW | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

INDW vs PAKW

INDW vs PAKW : पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी टीम इंडियासमोर मोठे आव्हान

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान, संघातून मोठी अपडेट समोर आली आहे. महामुकाबल्यापुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. उपकर्णधार स्मृती मानधना या सामन्यातून बाहेर पडली असल्याची माहिती समोर आली आहे. (INDW vs PAKW World Cup Vice Captain Smriti Mandhana Out Team India )

पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी सराव करत असताना स्मृतीच्या हाताला दुखापत झाली होती. तिच्या बोटाला लागले असल्याचे सांगण्यात आले आहे. स्मृतीबाबत आता प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांनी ही माहिती दिली.

ऋषिकेश कानिटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी हरमनप्रीत कौर ही पूर्णपणे फिट आहे. पण स्मृतीला या सामन्यापूर्वी दुखापत झाली होती. स्मृतीच्या बोटाला दुखापत झाली होती.

ही दुखापत गंभीर स्वरुपाची नव्हती. पण ती पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही, पण ती या पुढील सामन्यांमध्ये मात्र खेळणार आहे. असही कानिटकर यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Team India