Anurag Thakur : फक्त एक रणजी सामना, एकही धाव नाही अन् तो पोचला क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीत

नुकतंच आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
PM Narendra Modi Anurag Thakur
PM Narendra Modi Anurag ThakurSakal

क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेल्या अनेक व्यक्ती आपल्या देशात सापडतील. पण एक व्यक्ती अशी आहे जी फक्त एक रणजीचा सामना खेळून सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचे बॉस झालेत.

ही व्यक्ती म्हणजे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल यांचे पुत्र आणि मोदी सरकारमधले सध्या माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर. अनुराग ठाकूर यांनी २०००-०१ साली केवळ एकच रणजी सामना खेळला होता. या सामन्यात त्यांनी जम्मू काश्मीरच्या विरोधात खेळी केली होती. या सामन्यात त्यांनी सात चेंडूमध्ये एकही रन घेतली नाही. पण बॉलिंग करताना २ विकेट घेतल्या.

PM Narendra Modi Anurag Thakur
Sharad Pawar: दोन्ही नातू निवडणुकीच्या रिंगणात, पण रोहित पवारांची MCA च्या अध्यक्षपदी निवड

बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीमध्ये सहभागी होण्यासाठी कमीत कमी एक तरी सामना खेळणं आवश्यक असतं आणि हीच अट अनुराग यांनी पूर्ण केली. ते आधी ज्युनियर क्रिकेटच्या निवड समितीमध्ये गेले आणि त्यानंतर २०१३ मध्ये त्यांना बीसीसीआयचा मानद सचिव म्हणून निवडलं गेलं. माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून ठाकूर यांना ही पदं मिळाली, अशी टीकाही त्यांच्यावर झाली होती.

PM Narendra Modi Anurag Thakur
Rohit Pawar : असे बनले रोहित पवार MCAचे अध्यक्ष

२२ मे २०१६ रोजी त्यांची अध्य़क्ष म्हणून निवड झाली. २ जानेवारी २०१७ रोजी कोर्टाने त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन हटवलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष समितीने बनवलेल्या नियमांमुळे त्यांना आपल्या पदाचा त्याग करावा लागला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com