भारताचा इंडोनेशियास धक्का

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मुंबई - अश्विनी पोनप्पाने दुहेरीच्या दोन्ही लढती जिंकल्या, त्यापासून प्रेरणा घेत भारताने सुदीरामन कप सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत इंडोनेशियाला ४-१ असे हरवले. इंडोनेशियाने गेल्या स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले होते, त्यामुळे भारतासाठी हा विजय मोलाचा आहे. या विजयामुळे भारताच्या उपांत्यपूर्व फेरीच्या आशाही कायम आहेत.

डेन्मार्कविरुद्ध दुहेरीतील दोन लढतीत मोक्‍याच्या वेळी झालेल्या चुका अश्विनीला सलत होत्या. त्याची पुरेपूर भरपाई तिने इंडोनेशियाविरुद्ध केली. तिने १६ वर्षीय सात्विकराज रेड्डीच्या साथीत चुरशीची मिश्र दुहेरीची लढत जिंकत भारतास छान सुरुवात करून दिली. पहिला गेम १९-२० पिछाडीनंतर भारतीय जोडीने जिंकला; तर तिसऱ्या गेममध्ये १५-७ आघाडीनंतर भारतीय जोडीस सलग आठ गुण गमवावे लागले. तरीही भारतीय जोडीने रिओ ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या ताँतोवी अहमदला हार पत्करण्यास भाग पाडले. श्रीकांतने २८ व्या असलेल्या जोनाथन ख्रिस्तीचा पाडाव केला. त्यानंतर चिराग शेट्टी-सात्विकराजने पुरुष दुहेरीची लढत गमावली, पण सिंधूने महिला एकेरीची लढत सहज जिंकत विजय निश्‍चित केला. अश्विनीने सिक्की रेड्डीच्या साथीत महिला दुहेरीचा सामना जिंकत विजय साजरा केला.  इंडोनेशिया आणि डेन्मार्क लढतीनंतर गटातील चित्र स्पष्ट होईल.

निकाल : भारत वि. वि. इंडोनेशिया  
४-१ (अश्विनी पोनप्पा - सात्विकराज वि. वि. तौंतोवी अहमद - ग्लोरिया एमानुल २२-२०, १७-२१, २१-१९. किदांबी श्रीकांत वि. वि. जोनाथन ख्रिस्ती २१-१५, २१-१६. सात्विकराज - चिराग शेट्टी पराजित वि. मार्कस - केविन संजया ९-२१, १७-२१. पी. व्ही. सिंधू वि. वि. फित्रियानी २१-८, २१-१९. अश्विनी पोनप्पा - एन सिक्की रेड्डी वि. वि. डेल्ला देस्तारिया - रॉस्यिता एका पुत्री २१-१२, २१-१९).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inida win in badminton Tournament