Asian Athletics Championships 2025: गवंडी काम करणाऱ्याची मुलगी पूजा अन् सुरक्षारक्षकाची लेक नंदिनी यांनी सुवर्ण जिंकलं; आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं!

Pooja and Nandini Strike Gold for India at Asian Athletics 2025 : भारतीय खेळाडूंनी आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये आतापर्यंत ८ सुवर्णपदकांची कमाई करून स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. आजच्या दिवशी गुलवीर सिंग, पूजा व नंदिनी अगासरा यांनी सुवर्णपदक जिंकले.
Asian Athletics Championships 2025
Asian Athletics Championships 2025
Updated on

Asian Athletics Championships 2025 आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताचे पदकाचे खाते गुलवीर सिंगने १०,००० व ५००० मीटर शर्यतीत असे दोन सुवर्णपदकं जिंकून इतिहास रचला. पण, आजचा दिवस चर्चेत राहिला तो १८ वर्षीय पूजा अन् २० वर्षीय नंदिनी अगासरा यांच्या कामगिरीने. आई-वडिलांनी काबाडकष्ट करून या दोन्ही मुलींच्या पंखांना बळ दिले आणि आज या मुलींनी कष्टाचं चीजं करताना आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com