International Human Solidarity Day : कतारमधील FIFA वर्ल्डकप ठरला निर्वासितांचा वर्ल्डकप

International Human Solidarity Day FIFA World Cup 2022
International Human Solidarity Day FIFA World Cup 2022 esakal

International Human Solidarity Day FIFA World Cup 2022 : कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये 13 व्या सामन्यात स्वित्झर्लंडचा स्ट्रायकर ब्रील एम्बोलोने कॅमेरूनविरूद्ध गोल केला. हा त्याचा वर्ल्डकपमधील पहिला गोल होता. यानंतर ब्रीलने जोरदार सेलिब्रेशन करणे अपेक्षित होते. मात्र त्याने फार सेलिब्रेशन केले नाही. याचे कारण ब्रील हा जरी स्वित्झर्लंडकडून खेळत असला तरी त्याचा जन्म कॅमेरूनमधला आहे. त्यामुळेच त्याने आपला पहिला वहिला वर्ल्डकप गोल सेलिब्रेट केला नाही. ही त्याची ज्या देशात जन्म झाला त्या देशाबद्दल आदर व्यक्त करण्याची पद्धत होती.

International Human Solidarity Day FIFA World Cup 2022
PAK vs ENG: पाकिस्तान क्रिकेटमध्ये होणार भूकंप! रमीझ राजाबरोबर बाबरचे कर्णधारपद धोक्यात

मात्र कतारमध्ये जन्म एका देशाकडून आणि प्रतिनिधित्व दुसऱ्या देशाकडून करणारा ब्रील हा एकमेव फुटबॉलपटू नव्हता. यंदाच्या कतार वर्ल्डकपमध्ये जवळपास 136 फुटबॉलपटू असे होते ज्यांचा जन्म एका देशात झाला आणि ते दुसऱ्याच देशाकडून खेळत आहेत. यातील जास्तीजास्त खेळाडू हे आफ्रिकेच्या पाच देशांकडून खेळत आहेत. यात सेमी फायनलमध्ये पोहचलेला मोरोक्को हे तर सर्वात वेगळे उदाहरण ठरत आहे. मोरोक्कोच्या 26 खेळाडूंच्या संघातील निम्मे खेळाडू हे दुसऱ्या देशात जन्मलेले आहेत. फुटबॉल जगतात हे काही पहिल्यांदाच होत नाहीये. वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक 16 गोल करणारा जर्मनीचा स्ट्रायकर मिरोस्लाव्ह क्लोसे हे पोलंडमध्ये जन्मले होते.

मात्र यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जवळपास 16 टक्के फुटबॉलपटू हे आपले आपले फुटबॉल खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या देशात गेले. यावरून जगभरात झालेले विस्थापन आणि जगभरातील देशांनी विस्थापित झालेल्या इतर देशातील लोकांना आपलंस करणं हे जास्तच अधोरिखेत झाले आहे. या देशांनी विस्थापितांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी दिली. इतकेच नाही तर त्यांना आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यास दिले.

International Human Solidarity Day FIFA World Cup 2022
PAK vs ENG: इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडलं, इंग्लंडने पाकिस्तानची घरच्या मैदानावरच...

विशेष म्हणजे कतारमधील फिफा वर्ल्डकप हा 18 डिसेंबरला संपला आणि बरोबर दोन दिवसांनी आपण International Human Solidarity Day (20 डिसेंबर) साजरा करतोय. हा जबरदस्त योगायोग आहे. फिफाने खऱ्या अर्थाने गेली महिनाभर कतारमध्ये एकप्रकारे International Human Solidarity Day च साजरा केला.

International Human Solidarity Day साजरा करण्याचा उद्येश काय?

लोकांची एकजूट हा मिलेनियम डिक्लरेशनच्या 21 व्या शतकातील आंतरराष्ट्रीय संबंधांमधील एक मूळ मुल्य आहे. यामध्ये ज्या लोकांना काहीच मिळत नाही त्यांना मदत करणे हा उद्येश आहे. जागतिकीकरण, वाढती आर्थिक असमानता यादृष्टीकोणातून आंतरराष्ट्रीय एकजूटीला पर्याय नाही.

जागतिकीकरण, आर्थिक वाढीच्या फायद्यांपासून वंचित असलेल्या लोकांच्या पाठीशी उभे राहणे, आपल्याकडील अतिरिक्त गोष्टी शेअर करून त्यांना गरिबीतून बाहेर काढणे हे महत्वाचे आहे. यासाठीच संयुक्त राष्ट्राच्या सर्वासाधारण सभेने 20 डिसेंबर हा International Human Solidarity Day साजरा करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com