Olympic खेळाडूंना स्वत:च गळ्यात घालावं लागणार मेडल

Tokyo Olympics Medal
Tokyo Olympics Medalesakal

टोकियो : सध्या जगभरात कोरोनाच्या (Coronavirus) महामारीनं थैमान माजवलं असून याचा अनेक राष्ट्रांना मोठा फटका बसलाय. शिवाय, खेळांडूंवर देखील याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी क्रिकेट जगतातील सर्वात मोठी लिग समजल्या जाणाऱ्या आयपीएलला (Indian Premier League) देखील या महामारीनं त्रस्त करुन सोडलं होतं, त्यामुळे ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं (BCCI India) घेतला होता. मात्र, आता या संसर्गाचा मोठा फटका टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2021) विजेते ठरणाऱ्या खेळाडूंनाही बसणार आहे. कोरोना महामारीचा वाढता संसर्ग पाहून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून (International Olympic Committee) (आयओसी) महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार आता ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या तिन्ही खेळाडूंना (सुवर्ण, रौप्य, कास्य) स्वत:च्या हातानं ‘ट्रे’मधील मेडल उचलून स्वत:च्या गळ्यात घालावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेत अध्यक्ष थॉमस बाक (President Thomas Baak) यांनी दिलेत. (IOC President Thomas Baak Made an Important Decision Regarding The Medal Of Tokyo Olympic Athletes Sports News bam92)

Summary

सध्या जगभरात कोरोनाच्या महामारीनं थैमान माजवलं असून याचा अनेक राष्ट्रांना मोठा फटका बसलाय. शिवाय, खेळांडूंवर देखील याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

या ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना ‘नो एण्ट्री’हा करण्यात आली असून बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुण्यांनाही बंदी घालण्यात आलीय, त्यामुळे आता खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांसोबत शेकहॅण्ड करता येणार नाही. शिवाय, त्यांना मिठीही मारता येणार नसल्याचे आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी नुसतेच सांगितलेय. टोकियोमध्ये मुळात 2020 मध्ये ऑलिम्पिक होणार होतं. पण, कोव्हिड-19 च्या जागतिक साथीमुळे ते वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलं. आता 2021 वर्षात हे ऑलिंपिक होत असलं, तरी या खेळांना 'टोकियो 2020' म्हणूनच संबोधण्यात येतंय. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये काम करणारे स्वयंसेवक विजेत्या खेळाडूंना ‘ट्रे’मधून मेडल्स आणून देणार आहेत. या स्वयंसेवकाच्या हातामध्ये ग्लोव्हस देखील असणार आहेत. तसेच या वेळी प्रेसेण्टर व विजेत्या खेळाडूंच्या चेहऱ्यायावर मास्क असणार असून खेळाडूंना कोणालाही शेकहॅण्ड अथवा मिठी मारता येणार नसल्याचे थॉमस बाक यांनी आवर्जून सांगितलंय.

Tokyo Olympics Medal
Tokyo Olympics Medal

कोरोनाच्या महामारीमुळं प्रेक्षकांना मैदानावर जावून स्पर्धा पाहण्यास बंदी घालण्यात आली असून त्यांना घरीच राहून या स्पर्धेचा आनंद घ्यावा लागणार आहे. ऑलिम्पिक आयोजकांना क्रीडा महोत्सव यशस्वी पार पडणार याचा विश्वास असला, तरी प्रत्यक्षात कोरोना वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालेय. दरम्यान, ब्राझीलचा ऑलिम्पिक चमू वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आणखीनच टेन्शन वाढल्याचे दिसत आहे. जपानमधील बहुतांशी शहरांमध्ये यापूर्वीच आणीबाणीची घोषणा करण्यात आलीय. आता 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत टोकियोमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येणार असून याला आणखी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. कोरोना व ऑलिम्पिक या दोन्ही महत्त्वाच्या बाबींवर या वेळी जपानी सरकारसोबत आयओसी, आयोजक यांनाही लक्ष द्यावे लागणार आहे. सध्या टोकियोमध्ये काल (बुधवारी) 1149 कोरोनाबाधीत सापडले असून ही स्पर्धेसाठी चिंतेची बाब मानली जात आहे.

IOC President Thomas Baak Made an Important Decision Regarding The Medal Of Tokyo Olympic Athletes Sports News bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com