ऑलिंपिक समितीने भारताला बजावले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पुलवामा येथील दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानी स्पर्धकांना व्हिसा नाकारल्यामुळे भारताबरोबरील ऑलिंपिक खेळांशी संबंधित स्पर्धांच्या संयोजनाबाबतची चर्चा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसीने-इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी) थांबविली आहे. पाकिस्तानी नेमबाजांचा सहभाग असलेल्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारातील दोन ऑलिंपिक कोटा आयओसीने गुरुवारीच रद्द केला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्याहून तीव्र परिणामांची शक्यता असलेले हे वृत्त येऊन थडकले.

या स्पर्धेतील इतर 14 कोटा आयओसीने कायम राखले, पण अनेक स्पर्धक भारतात येऊन यापूर्वीच दाखल झाले असल्यामुळे आणि अखेरच्या क्षणी त्यांना कोटा नाकारणे अन्यायकारक ठरेल अशी सौम्य भूमिका आयओसीने घेतली. मात्र ऑलिंपिकशी संबंधित स्पर्धांध्ये सर्व स्पर्धकांना प्रवेश देण्याची लेखी हमी भारत सरकारने द्यायला हवी असे आयओसीने बजावले आहे. तोपर्यंत कोणतीही स्पर्धा घेण्याबाबत भारताबरोबरील चर्चा थांबविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

ऑलिंपिक तत्त्वप्रणालीच्या विरोधात
आयओसीने स्पष्ट केले की, भारताची भूमिका ऑलिंपिक तत्त्वप्रणालीच्या विरोधात जाणारी आहे. यानुसार यजमान देश क्रीडा स्पर्धा संयोजनात कोणत्याही प्रकारचा भेदभाव आणि राजकीय हस्तक्षेप करू शकत नाही.

काय परिणाम होणार
भारतात यानंतर आणखी एक विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धा होणार आहे. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धा, युवा ऑलिंपिक आणि ऑलिंपिकच्या संयोजनातही भारताने रस दाखविली आहे. त्यासाठी यजमानपद प्रस्ताव सादर करण्याची तयारी सुरु आहे. अशावेळी सरकार हमी देत नाही तोपर्यंत या आघाडीवर कोणतीही हालचाल होणार नाही असे या घडीचे चित्र आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IOC Urges India's Isolation, Kills Talks on Hosting Future Events After Pakistani Shooters Denied Visa