esakal | IPL 2021: कॅप्टन्सीचं ओझं मयांकनं रेकॉर्ड करुन पेललं, पण...

बोलून बातमी शोधा

Mayank Agarwal

IPL 2021: कॅप्टन्सीचं ओझं मयांकनं रेकॉर्ड करुन पेललं, पण...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) ने आयपीएलच्या 14 व्या हंगामात (IPl 2021) पहिल्यांदाच पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत त्याने नेतृत्वाला साजेशी खेळी केली. दल्ली कॅपिटल्स विरुद्ध मयांकने नाबाद 99 धावा केल्या. संघाच्या धावसंख्येच्या जवळपास 60 टक्के धावा या त्याने एकट्याने कुटल्या. आपल्या खेळीत त्याने 58 चेंडूत 8 चौकार 4 षटकार खेचले. लोकेश राहुलला अपेंडिक्सचा त्रास होत असल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलय. त्याच्या अनुपस्थितीत कर्णधाराची जबाबदारी मयांक अग्रवालवर आलीये.

हेही वाचा: VIDEO भावा मानलं! पाणउतारा होऊन वॉर्नर पाणी द्यायला धावला

पंजाबच्या संघाची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या 35 धावांवर 2 विकेट गमावल्या असताना मयांकने डावाला आकार दिला. एका बाजूने विकेट पडत असताना तो शेवटपर्यंत मैदानात तग धरुन उभा राहिला. त्याच्या खेळीच्या जोरावरच पंजाबने 6 विकेटच्या मोबदल्या धावफलकावर 166 धावा लावल्या. अखेरच्या 70 धावा केवळ 33 चेंडूत निघाल्या.

मयांकच्या नावे झाला खास रेकॉर्ड

मयांक अग्रवालचा कर्णधार म्हणून पहिला सामना होता. त्याने नाबाद 99 धावांची खेळी करुन खास विक्रम आपल्या नावे केलाय. एखाद्या संघाच्या कॅप्टनने पहिल्या मॅचमध्ये केलेली आयपीएलमधील ही दुसऱ्या क्रमांकाची खेळी आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात 119 धावांची खेळी केली होती. 99 धावांची नाबाद खेळी करणारा मयांक तिसरा फलंदाज आहेत 2013 च्या हंगामात रैनानने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध तर 2019 च्या हंगामात ख्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात 99 धावांची नाबाद खेळी केली होती.

हेही वाचा: VIDEO : रबाडासमोर गेल भाऊ गडबडला? फुलटॉसवर उडाल्या दांड्या

कागिसो रबाडाने घेतल्या 3 विकेट

पंजाब किंग्जच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सच्या विरुद्ध निर्धारित 20 षटकात 166 धावा केल्या. राहुलच्या अनुपस्थितीत मयांकने कर्णधाराला साजेसा खेळ केला. दिल्ली कॅपिटल्सकडून कागिसो रबाडाने 36 धावा खर्च करुन 3 विकेट घेतल्या. त्याने प्रभसिमरन सिंग (16 चेंडूत 12 धावा), क्रिस गेल (9 चेंडूत 13 धावा) तसेच डेविड मलानला 26 धावांवर बाद केले. या तिन्ही विकेट महत्वपूर्ण अशा होत्या.