IPL 2020 :मयांक अगरवालच्या प्रयत्नांवर 'टाय' सामन्याने पाणी, दिल्लीचा विजय 

सकाळ ऑनलाईन
Sunday, 20 September 2020

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील दुसरा सामना चांगलाच रंगतदार झाला.   Delhi Capitalsvs KXIP  दोन्ही संघात टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात दिल्लीने बाजी मारली.

दुबई : कमालीचा रंगतदार झालेल्या  'टाय' सामन्यात दिल्लीने पंजाबचा पराभव करुन यंदाच्या आयपीएलमधील थरारक सामना जिंकला. सुपर ओव्हरमधील रबाडाची भेदक गोलंदाजी दिल्लीच्या विजयात मौल्यवान ठरली.  सुपर ओव्हरमध्ये रबाडाने तीन चेंडूतच पंबाजच्या राहुल आणि पुरन यांना बाद केले त्यामुळे दिल्लीला विजयासाठी सहा चेंडूत तीन धावा असे आव्हान मिळाले होते. पण शमीने एक चेंडू वाईड टाकला आणि रिषभ पंतने दोन धावा करुन दिल्लीला विजयी केले. 

पंजाबला विजयासाठी अखेरच्या 18 चेंडूत 42 धावांची गरज असताना अगरवालने 60 चेंडूत 89 धावांची अविस्मरणीय खेळी करुन सामन्याला निकाल बदलण्याच्या दिशेने वाटचाल केली. अगरवाल केएल राहुलसह सलामीला आला होता पण संघाचा विजयासाठी एका धावेची गरज असेपर्यंत मैदानात होता पण तो अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर बाद झाला. एक चेंडू एक धाव असे समीकरण असताना जॉर्डनही बाद झाला त्यामुळे सामना टाय झाला. दिल्लीच्या 157 धावांसमोर पंजाबची 5 बाद 55 अशी अवस्था झाली होती या कठीण परिस्थिनंतर अगरवालने बघता बघता सामन्यात रंग तर भरलेच पण आपल्या संघाला विजयी पथावर आणले होते. 
त्याअगोदर स्टॉयनिसने 21 चेंडूत 53 धावांचा घणाघात सादर केला त्यामुळे दिल्लीने 157 धावा केल्या होत्या. 

अश्‍विन जखमी 
पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवणाऱ्या आर. अश्‍विनने या पहिल्या षटकांत आणखी एक विकेट मिळवली, परंतु चेंडू अडवताना त्याचा खांदा दुखावला. त्यानंतर तो मैदानात आला नाही. 

संक्षिप्त धावफलक दिल्ली : 20 षटकांत 8 बाद 157 (श्रेयस अय्यर 39 -32 चेंडू, 3 षटकार, रिषभ पंत 31 -29 चेंडू, 4 चौकार, मार्कस स्टॉयनिस 53 -21 चेंडू, 7 चौकार, 3 षटकार, कॉट्रेल 24-2, महम्मद शमी 15-3) वि. पंजाब 20 षटकांत 8 बाद 157 (केएल राहुल 21 -19 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, मयांक अगरवाल 89 -60 चेंडू, 7 चौकार, 4 षटकार, रबाडा 28-2, अश्‍विन 2-2)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL 2020 Delhi vs Punjab 2nd Match Live Cricket Score records And result UAE