मुंबई इंडियन्सचा श्रीगणेशा  कोलकतावर 49 धावांनी मात, रोहितही बहरला 

Mumbai Indians
Mumbai Indians

अबुधाबी: कोलकताचा संघ कितीही ताकदवर असो, पण त्यांच्याविरुद्ध नेहमीच यशस्वी ठरणाऱ्या मुंबई इंडियन्सने ही परंपरा कायम राखली आणि आयपीएलच्या 13 व्या हंगामात विजयाचा श्रीगणेशा केला. 49 धावांनी विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने निर्णायक 80 धावांची खेळी केली.  कोलकताविरुद्ध मुंबईने आजच्या सामन्यापूर्वी 10 पैकी नऊ लढती जिंकल्या आहेत. आजही सहज वर्चस्व प्रस्तापित केले. रोहितच्या शानदार खेळीमुळे 195 धावा करणाऱ्या मुंबईने कोलकता संघाला 146 धावांवर रोखले. अमिरातीमधील मुंबईचा हा पहिला विजय ठरला. 

चेन्नईविरुद्ध गोलदाजीत केलेल्या चुका आज मुंबई सुधारल्या आणि पहिल्यापासून त्यांच्या डावावर वर्चस्व मिळवले. गिल आणि नारायण ही सलामीची जोडी झटपट बाद केली त्यानंतर भले दिनेश कार्तिक आणि नितिश राणा यांना डाव सावरला, परंतु आवश्‍यक धावांचा बोजा वाढत गेला. त्यातच ते बाद झाले. 

..आणि विजय निश्‍चित झाला 

मुंबईला भिती होती ती आंद्रे रसेल आणि मॉर्गन यांच्याकडून परंतु बुमारने आपल्या एकाच षटकात या दोघांना बाद करुन मुंबईचा विजय निश्‍चित केला.  सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेक गमवल्यामुळे प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या मुंबईला सुरवातीला धक्का बसला गेल्या सामन्यात शानदार फलंदाजी करणारा डिकॉक बाद झाला, परंतु कर्णधार रोहितला चांगला सूर सापडला. कोलकता संघाविरुद्ध रोहितचे बॅट हमखास तळपते आजही ती बहरली. 148 च्या स्ट्राईक रेटने त्याने 54 चेंडूत 80 धावा केल्या. 

रोहित आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. त्यावेळी मुंबई द्विशतकी मजल मारणार हे निश्‍चित वाटत होते. सूर्यकुमार बाद झाल्यावर आलेल्या तिवारीने छोटेखानी 21 धावांची खेळी केली, परंतु ज्याच्याकडून आशा होत्या त्या हार्दिक पंड्याने पुन्हा एकदा निराशा केली, तो स्वयंचीत झाला. 150 वा आयपीएल सामना खेळणाऱ्या पोलार्डने अखेरच्या षटकांत आक्रमता दाखवल्यामुळे मुंबईला 195 धावा करता आल्या. 

संक्षिप्त धावफलक : मुंबई 20 षटकांत 5 बाद 195 (रोहित शर्मा 80 -54 चेंडू, 3 चौकार, 6 षटकार, सूर्यकुमार यादव 47 - 28 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, सौरव तिवारी 21 -13 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, हार्दिक पंड्या 18 -13 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, शिवम मावी 32-2, आंद्रे रसेल 17-1) वि. वि. कोलकता ः 20 षटकांत 20 षटकांत 9 बाद 146 (दिनेश कार्तिक 30 -23 चेंडू, 5 चौकार, नितिश राणा 24 -18 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, मॉर्नग 16, रसेल 11, कमिंस 33 -12 चेंडू, 1 चौकार, 4 षटकार, बोल्ट 30-2, पॅटिंन्सन26-2, बुमरा 32-2)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com